Karnataka पोलिसांनी त्यांच्या घरी नोटीस बजावली
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : Karnataka तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह यांना पुढील ३ महिन्यांसाठी कर्नाटकात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश बागलकोट जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केले असून, आज पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना नोटीस दिली आहे. यानंतर भाजप आमदाराने याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी कर्नाटक सरकारचा हा निर्णय हिंदुविरोधी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काँग्रेस सरकारला हिंदुविरोधी सरकार म्हटले आहे. Karnataka
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ टाउनच्या गणेश विसर्जन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हैदराबादच्या घोष महल येथील भाजप आमदार टी. राजा सिंह यांना आमंत्रित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलीस त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पोहोचले. पोलिसांनी त्यांना बागलकोट जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांना राज्यात येण्यास बंदी घालणारी नोटीस दिली.
डीएमने या नोटीसमध्ये लिहिले आहे की, राजा सिंह भडकाऊ भाषणे देऊन दोन समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करतात, 2015 मध्ये कर्नाटकमध्ये जातीय हिंसाचार पसरवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि या गोष्टी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही सिद्ध झाले आहेत. मुधोळ येथे ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे ते ठिकाण अत्यंत संवेदनशील असून, राजा सिंह यांना तेथे येऊ दिल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असेही या पत्रात लिहिले आहे.
Donald Trump : मोदींचा अमेरिकेतही जलवा; डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारादरम्यान म्हणाले…
एक व्हिडिओ जारी करताना भाजप आमदार राजा सिंह म्हणाले की, काल मला कर्नाटकातील बागलकोट येथे गणेश विसर्जन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, त्यासंदर्भात आज कर्नाटक पोलिसांनी मला घरी नोटीस दिली आहे की माझ्या आगमनाने वातावरण बिघडेल. तुमच्याविरोधात खूप केसेस आहेत. बागलकोटमध्ये ज्या मार्गावरून गणेश विसर्जन होणार आहे त्या मार्गावर एक मशीद असून तेथे अल्पसंख्याक राहत असल्याने वातावरण बिघडू शकते. त्यामुळे आम्ही तुमच्यावर कर्नाटकात ३ महिन्यांची बंदी घातली आहे. असं ते म्हणाले आहेत.Karnataka
ते पुढे म्हणाले की, माझ्यामुळे कुठेही जातीय हिंसाचार झाला नाही, माझ्यावर कर्नाटक किंवा इतर कोणत्याही राज्यातून कोणताही खटला दाखल झाला, मी उच्च न्यायालयात जिंकलो आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकार हे हिंदुविरोधी सरकार मानले पाहिजे. हिंदूंना हिंदूंच्या कार्यक्रमांना येण्यापासून रोखले जात असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. Karnataka
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App