Arvind Kejriwals : ‘दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

Arvind Kejriwals

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने सर्व कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दोन दिवसांनी अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwals  ) यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी पक्ष कार्यालयात पोहोचले होते. येथे त्यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी राजीनामा जाहीर केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने सर्व कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.



कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, मी आजपासून दोन दिवसांनी राजीनामा देणार आहे. आता जनता केजरीवाल प्रामाणिक असल्याचा निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.

सत्येंद्र जैन, अमानतुल्ला खान हेही लवकरच तुरुंगातून बाहेर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या लोकांनी आमच्यासाठी प्रार्थना केली आहे. मी त्याचे आभार मानतो. मी तुरुंगात अनेक पुस्तके वाचली आहेत. मी रामायण वाचले, मी गीता वाचली. मी माझ्यासोबत भगतसिंग यांची जेल डायरी आणली आहे. मी भगतसिंग यांची डायरीही वाचली आहे.

I will resign from the post of Chief Minister after two days Arvind Kejriwals announcement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात