Rahul Gandhi : भारतात हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी जातिगत जनगणनेची राहुल गांधींची मागणी, पण अमेरिकेत जाऊन आरक्षण संपविण्याची वकिली!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  Rahul Gandhi : भारतात हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी जातिगत जनगणनेची मागणी पण अमेरिकेत जाऊन राहुल गांधींची आरक्षण संपविण्याची वकिली!!… असली दुटप्पी भूमिका राहुल गांधींनी घेतल्याबरोबर काँग्रेस अडचणीत आली.

राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक न्याय या विषयावर काँग्रेसची भूमिका कशी भुसभुशीत आणि दुटप्पी आहे, हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी या दोन वरिष्ठ नेत्यांच्या तोंडात उघड्यावर आले. गृहमंत्री असताना काश्मीरमध्ये जायला माझी फाटत होती, पण सांगू कुणाला??, असा असावा सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याच पुस्तकाच्या प्रकाशनात केला आणि एका वाक्यात यूपीए सरकारच्या भुसभुशीत धोरणाच्या चिंध्या केल्या होत्या.

त्याचवेळी अमेरिका दौऱ्यामध्ये राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष भारतातले आरक्षण संपवायचा योग्य वरील विचार करेल असे वक्तव्य करून काँग्रेसच्या सामाजिक धोरणाच्या चिंध्या केल्या. भाजप आणि बाकीच्या काँग्रेस विरोधकांना या निमित्ताने काँग्रेसला ठोकायची संधी मिळाली.


Sushil Kumar Shinde : सुशील कुमार शिंदे म्हणाले, गृहमंत्री असताना लाल चौकात आणि दल सरोवराकडे जाण्याची भीती वाटायची


भारतात असताना राहुल गांधी गेले काही दिवस सातत्याने जातिगत जनगणनेची मागणी करत आहेत. हिंदू समाजात फूट पाडण्याचा त्यांचा इरादा उघड दिसतो आहे. भारतात फक्त 10 % लोकांकडे 90 % संपत्ती आहे आणि उरलेल्या 90 % लोकांकडे 10 % संपत्ती आहे. अनेक क्षेत्रांमध्ये दलित, आदिवासी यांची मालकीचं नाही, असा दावा करून राहुल गांधींनी जातिगत जनगणनेची मागणी केली. प्रसार माध्यमांनाही त्यांनी सोडले नाही. प्रसार माध्यमांच्या मालकांमध्ये आदिवासी, दलित पिछड्या वर्गातले किती आहेत??, असे सवाल त्यांनी अनेकदा केले. आपणच दलित, आदिवासी आणि पिछड्या वर्गाचे मसीहा आहोत, अशी प्रतिमा निर्मिती करायचा त्यांचा यातून प्रयत्न दिसला.

पण अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याबरोबर राहुल गांधींची भाषा बदलली. वॉशिंग्टन मधल्या जॉर्ज टाऊन विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी भारतात सामाजिक वातावरण अनुकूल झाले. या काँग्रेस पक्ष आरक्षण संपवायचा विचार करेल, असे वक्तव्य केले. तिथे देखील त्यांनी हिंदू समाजात फूट पाडण्याच्या दृष्टीने जातिगत जनगणनेची मागणी पुढे रेटलीच. पण त्यांच्या वक्तव्याचा सगळा भर आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती कशी निर्माण होईल, यावर होता.

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती, भाजपचे नेते रविशंकर प्रसाद, लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठोकून काढले. राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा खरा वर्चस्ववादी भेसूर चेहरा उघड्यावर आणला, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या दुटप्पी सामाजिक भूमिकेचे या तिन्ही नेत्यांनी वाभाडे काढले.

Rahul Gandhi pitches to end reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात