वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेत ( Sri Lanka ) 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २ आठवड्यांहूनही कमी कालावधी राहिला आहे. या वेळेस 38 पेक्षा जास्त उमेदवार राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. मात्र, मुख्य लढत 4 उमेदवारांमध्ये आहे. यामध्ये नॅशनल पीपल्स पॉवरचे(एनपीपी) अनुरा कुमारा दिसनायके, समागी जन बालवेगयाचे(एसजेबी) विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा एक स्वतंत्र उमेदवाराच्या रूपात लढत आहेत.
राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल मैदानात आहेत. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, या वेळच्या निवडणुकीत ५ वर्षांपूर्वी स्थापन नॅशनल पीपल्स पॉवरचे(एनपीपी) पारडे जड आहे आणि अनेक लोकांना आशा आहे की, ५५ वर्षीय अनुरा कुमारा दिसनायके श्रीलंकेचे ९ वे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. त्यांचा चीनकडे ओढा आहे.
सध्याचे राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत मागे पडल्याचे श्रीलंकेत प्रथमच घडत आहे. सध्या राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे. नमल निवडणूक लढवत असले तरी ते चौथ्या क्रमांकावर आहेत. २०१९ मध्ये, नमल यांचे काका गोटाबाया राजपक्षे सत्तेवर आले परंतु २०२२ मध्ये जनआंदोलनानंतर गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडावा लागला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App