वृत्तसंस्था
कोलकाता : कोलकात्याच्या ( Kolkata ) आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी आज 28व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा मृत महिला डॉक्टरचे पालकही आंदोलनात सामील झाले.
पीडितेचे वडील म्हणाले- पोलीस सुरुवातीपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत आम्हाला पोलीस ठाण्यात थांबावे लागले. नंतर जेव्हा मुलीचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला तेव्हा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला पैसे देऊ केले.
पीडितेच्या पालकांचे कोलकाता पोलिसांवर दोन आरोप
वडील म्हणाले, अंत्यसंस्कार होईपर्यंत 300-400 पोलिसांनी आम्हाला घेराव घातला, पण अंत्यसंस्कार झाल्यानंतर एकही पोलिस तिथे दिसला नाही. कुटुंब काय करणार, घरी कसे जाणार, पोलिसांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही.
ते म्हणाले की, घरी आई-वडिलांसमोर मुलीचा मृतदेह पडून असताना आम्ही अश्रू ढाळत होतो, पोलीस पैसे देत होते, हीच का पोलिसांची माणुसकी? पोलीस म्हणत होते की त्यांनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, याला जबाबदारी पार पाडणे म्हणायचे का?
सुकांत मजुमदार म्हणाले- TMC संदीप घोष यांना वाचवत आहे
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, आपल्या राज्यात बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. ममतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. मी या राज्यातील केंद्रीय मंत्री आहे. ममता यांनी राजीनामा दिल्यास मीही राजीनामा देण्यास तयार आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता यांनी त्यांची एकामागून एक पदावर नियुक्ती केली. आरजी कारमध्ये त्यांना प्राचार्य पदावरून हटवल्यानंतर त्यांची रवानगी नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली.
नॅशनल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घोष यांना आत प्रवेश दिला नाही तेव्हा त्यांची आरोग्य विभागात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्या व्यक्तीवर सर्वाधिक आरोप झाले आहेत त्यांना संरक्षण देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
मात्र, 28 ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) संदीप घोष यांचे सदस्यत्व रद्द केले होते. 3 सप्टेंबर रोजी राज्याच्या आरोग्य विभागानेही घोष यांना निलंबित केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App