विशेष प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा अपबीट मूड असला, तरी त्यांची आपापसांतली स्पर्धा जास्त वाढीला लागली आहे. पवारांनी ( sharad pawar ) दक्षिणेतल्या सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय मुशाफिरी करून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप फोडून आपल्या राष्ट्रवादीचे बळ वाढवायला सुरुवात केल्यानंतर काँग्रेसने देखील थेट पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच त्यांच्या पक्षावर सेंधमारी चालवली.
पवारांच्या अखंड राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेले हडपसर आणि पर्वती मतदारसंघांवर काँग्रेसने दावा सांगायला सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या चार मतदारसंघांवर काँग्रेसने देखील दावा सांगितला.
काँग्रेसच्या या आक्रमक पवित्रामुळे राष्ट्रवादीचे नेते अडचणीत सापडले. पण त्यांनी भाजप शिवसेना अजितदादांचे राष्ट्रवादी वगैरे पक्ष सोडून देऊन काँग्रेसवरच चढाई करण्याची तयारी चालवण्याची बातमी समोर आली.
राष्ट्रवादीतल्या फुटीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष पुण्यात पुन्हा एकदा वाढवा, असा कानमंत्र नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नानांना “भावी मुख्यमंत्री” म्हणून खांद्यावर उचलून घेतले, पण त्याचेच नेमके राष्ट्रवादीला “अपचन” झाले. पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नानांना फैलावर घेतले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला इतरांपेक्षा मोठे यश मिळाले असले, तरी महाविकास आघाडीच्या यशामध्ये शरद पवारांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रशांत जगताप यांनी नानांना सुनावले.
विधानसभा निवडणुकीतले यश डोळ्यासमोर दिसायला लागताच, बाकीच्या पक्षांवर चढाई करणे राहिले बाजूला, त्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकमेकांचे असेलच राजकीय लचके तोडायला सुरुवात केल्याचे चित्र दिसायला लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App