Agniveer scheme : अग्निवीर योजनेविरुद्ध काँग्रेसने पुकारला एल्गार; सरकारने योजना विस्तार पुढे आणून काँग्रेसलाच पकडले पेचात!!

Agniveer scheme

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अग्निवीर योजनेमार्फत सैन्य दलांचा चेहरा मोहरा तरुण करण्याचा मोदी सरकारने चंग बांधल्यानंतर संबंधित अग्निपथ – अग्निवीर योजना तरुणांच्या विरोधात आहे, अशी हाकाटी पिटत काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी ही योजना बंद पाडायचा एल्गार पुकारला. त्याला काही प्रमाणात नितीश कुमारांच्या जदयूची साथ मिळाली.

अग्निवीर 4 वर्षांच्या सेवेनंतर बेरोजगार होतील. ही योजना तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणारी आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेची देखील खेळ होतो आहे, वगैरे टीका करून काँग्रेसने आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी अग्निपथ – अग्निवीर योजना ठप्प करण्याचा एल्गार पुकारला. केंद्रात इंडी आघाडी सत्तेवर आली, की आम्ही अग्निपथ – अग्निवीर ही योजना बंद करू. सध्याच्या केंद्र सरकारला ती योजना मागे घ्यायला भाग पाडू, असे आव्हान राहुल गांधींचे सकट अनेक नेत्यांनी दिले होते. त्या उलट काही मशिदींमधून अग्निवीर योजनेत मुस्लिम तरुणांनी अर्ज दाखल करावेत, असे फतवेही निघाल्याच्या बातम्या आल्या.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अग्निवीर योजनेत महत्त्वपूर्ण बदल करून तिचा विस्तार करायचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. सध्या अग्निपथ योजनेतील 25% तरुणांना सैन्य दलांमध्ये कायमची नोकरी टिकणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अग्निपथ योजनेतील अग्निवीर तरुणांना पोलीस भरती, तसेच वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांमध्ये तिथल्या सरकारांनी राखीव जागांची टक्केवारी जाहीर केली. यातून अग्निवीर तरुणांच्या भवितव्याविषयी केंद्र सरकारने विविध योजनांद्वारे तोडगा काढायचा प्रयत्न केला.

परंतु तो काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांना मान्य झाला नाही. कारण अग्निपथ – अग्निवीर योजनेमार्फत केंद्र सरकार हिंदू तरुणांची सैन्य भरती करत असल्याची भीती काँग्रेस सह विरोधी पक्षांना वाटली. त्यामुळे त्यांनी अग्निपथ – अग्निवीर योजने विरोधात एल्गार पुकारला, पण त्याचा परिणाम उलटाच झाला.

केंद्र सरकारने आता अग्नीपथ – अग्निवीर योजनेमध्ये 25 % तरुणांना कायम नोकरी देणे ऐवजी 50 % पर्यंत तरुणांची नोकरी कायम करावी, अशी शिफारस केल्याची बातमी आली, तसेच त्यांच्या वेतन आणि सुविधांमध्ये देखील सुधारणा करण्याची शिफारस थेट सैन्य दलांनी केल्याचीही बातमी आली. त्यामुळे अग्निवीर योजनेचा यातून मोठा विस्तारच होणार असून अग्निवीरांची संख्या एकदम दुप्पट होण्याची शक्यता आहे. अग्निवीरांच्या कायम भरतीची संख्या टप्प्याटप्प्याने दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची बातमी समोर आली आहे.

Modi government may expand Agniveer scheme

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात