Congress : पतंगराव कदम पुतळा अनावरण कार्यक्रमात शरद पवारांसमोर काँग्रेस नेत्यांचा पतंगरावांच्या काँग्रेसनिष्ठेचा गजर!!

Congress

विशेष प्रतिनिधी

सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगलीतील कडेगाव मध्ये उभारलेल्या पुतळा स्मारक अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर काँग्रेस नेत्यांनी पतंगरावांच्या काँग्रेसनिष्ठेचा जबरदस्त गजर केला. Congress leaders praised patanangrao kadam’s party loyalty in front of sharad pawar

काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण झाले. यावेळी माजी मंत्री आणि पतंगरावांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी कडेगावात मोठे शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनासाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार विशाल पाटील आदी नेते उपस्थित होते.

पतंगरावांनी आपल्या सार्वजनिक जीवनातली 60 वर्षे काँग्रेसला वाहिली होती. काँग्रेसवर त्यांची अखंड निष्ठा होती. त्या निष्ठेतूनच त्यांनी महाराष्ट्रात प्रचंड काम उभे केले. पतंगरावांनी आयुष्यामध्ये कधीही निष्ठा बदलली नाही. काँग्रेसशी संपूर्ण जीवनभर निष्ठावान राहिले, अशा शब्दांमध्ये सर्वच काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांसमोर पतंगरावांच्या कार्याचा गौरव केला.

राहुल गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवातच पतंगराव कदम यांच्या काँग्रेस निष्ठे संदर्भातली गोष्ट सांगून केली. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर देखील पतंगराव कदम यांनी त्यांची साथ सोडली नव्हती. सांगलीमध्ये इंदिरा गांधींची रात्री 2.00 वाजता जाहीर सभा घेण्याची हिंमत पतंगरावांनी त्यावेळी केली होती, अशी आठवण राहुल गांधींनी शरद पवार यांच्यासमोर सांगितली. काँग्रेसशी असलेल्या निष्ठेतूनच पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रात मोठे शैक्षणिक कार्य उभे केल्याचा गौरव राहुल गांधींनी केला. मल्लिकार्जुन खर्गे आणि नाना पटोले यांनी देखील पतंगराव कदम यांच्या काँग्रेसनिष्ठेचा आवर्जून उल्लेख केला.

शरद पवारांनी राजकीय आयुष्यात दोनदा काँग्रेस सोडली, पण नंतर ते काँग्रेसच्याच सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याच समोर पतंगराव कदम यांच्या काँग्रेस निष्ठेचा केलेला गौरव पवारांना टोचणारा ठरला.

Congress leaders praised patanangrao kadam’s party loyalty in front of sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात