विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कागलच्या गैबी चौकात शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेत समरजित घाडगे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले. ते आव्हान हसन मुश्रीफ यांनी आज स्वीकारले. Hasan Mushrif accepts samarjit ghatge’s challenge
शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. ते माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागत आहेत, हे मला कळत नाही, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार साहेब आपसे बैर नही. लेकिन समरजीत तेरी खैर नही, अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी गैबी चौकातले आव्हान स्वीकारले.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
मी अनेकदा सांगितले आहे, की लोकशाहीत एखाद्या वक्तीचे वय 25 वर्षांच्या वर झाले, की तो निवडणूक लढवू शकतो. आता तर 7 पक्ष झाले आहेत, त्यामुळे उमेदवारांची मांदियाळी झाली आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले. ते काय म्हणतात माहिती नाही. पण पवार साहेब माझे दैवत आहेत. पवार साहेब माझ्या मागे का लागले आहेत, हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत? असा मनातला प्रश्न मुश्रीफ यांनी बोलून दाखवला.
Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला ठोकले; पण पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्याला बाजूला सारले!!
पवारांना करून दिली आठवण
माझ्या सहा निवडणुकांमध्ये शरद पवार आले, ते नेहमी म्हणायचे की राजा विरोधात प्रजा जिंकली पाहिजे. तेच मी पुन्हा म्हणत आहे, की प्रजा जिंकली पाहिजे. निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही. लेकिन समरजीत तेरी खैर नही, असंही मुश्रीफ म्हणाले.
माझे म्हणणे काय आहे, की जयंत पाटील साहेब आले होते. तेव्हा प्रवेश झाला नाही. साहेब आले तेव्हा प्रवेश झाला. माझ्या सारख्या अल्पसंख्याक माणसाच्या मागे का लागता?? ही निवडणूक नायक विरूद्ध खलनायक अशी असेल, असे मुश्रीफ म्हणाले.
जिथे जागा रिक्त आहेत तिकडे अनेक जण जात आहेत. गेल्या वेळी सुद्धा प्रयत्न झाला होता. पण मेहुणे पाहुणे समजवण्या पलिकडे आहेत. त्यासाठी निवडून यावे लागते, बहुमत लागते, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना, ज्या भागात ज्यांचं काम आहे त्यांचं मत जाणून घेणार असल्याचं सांगितलं होतं. नागरिकांमध्ये ज्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे त्यांचं स्वागत आहे. आता कागलमध्ये समरजित घाटगे यांची गरज विधानसभा मतदार संघात आहे, कागलच्या जनतेच्या डोळ्यात मला समरजित यांच्या विषयीची आस्था दिसली, असे शरद पवार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App