साडेतीन लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार आणि पेन्शन पोहोचले नाही.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश सरकार सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शनही देऊ शकत नसल्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या बँक खात्यात दर महिन्याच्या एका तारखेला पगार आणि पेन्शन पोहोचते, मात्र सप्टेंबरच्या एका तारखेला राज्यातील २ लाख कर्मचारी आणि दीड लाख पेन्शनधारकांचे पगार त्यांच्या खात्यात पोहोचले नाहीत. आर्थिक संकटामुळे राज्यात पहिल्यांदाच असे घडले आहे. कर्मचाऱ्यांना पगारासाठी 5 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे मानले जात आहे.
Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
हिमाचल प्रदेशवर सध्या 94 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे जुनी कर्जे फेडण्यासाठी सरकारला नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. राज्य सरकारवर कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे दायित्व आहे. इतके पैसे देऊ न शकल्याने सरकारवर सातत्याने टीका होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App