विशेष प्रतिनिधी
लातूर : मराठ्यांना माझे सांगणे आहे की, यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते जबाबदारी झटकून टाकणारे शरद पवारांसारखे भित्री भागुबाई नव्हते, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. व्ही. एस. पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले. शरद पवारांच्या राजकारणाचे तर त्यांनी अक्षरशः वाभाडे काढले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
येणारे काही महिने वादळी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यातून शासनाचा भ्रष्टाचार समोर आला. सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या. पण महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणाचा आधार हा “विकास” नाहीतर, दंगल घडविणे हा आहे. मुलींच्या अत्याचारावर मोर्चे निघाले, अत्याचार वाढले, पण त्याची विटंबनाही होत आहे हे दुर्दैवी आहे. पण ही विटंबना आलीच कोठून फाशी देऊन हे मिटणार नाही. पण जे पेरलं तेच उगवतं. आजच्या राजकारणातून हेच पेरलं जात आहे.
राजकारण, भाषण, मोबाईल, बातम्या यातून केवळ द्वेषाच सांगितले जात आहे. ही हिंसाच आहे आणि तेच आता घडत आहे. यातूनच लैंगिक अत्याचार वाढत आहे. शांतता आणि एकमेकांचा आदर पेरला तर या घटना कमी होतील. अत्याचाराच्या घटनामागे आरएसएस, भाजप, बजरंग दल यांची प्रक्षोभक भाषणे आहेत. द्वेषाच्या औषधातून या घटना घडत आहेत. विधानसभेची निवडणूक ही मराठा आणि ओबीसी अशीच आहे. वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा काढली म्हणून मराठवाडा शांत आहे.
Kolkata : कोलकाता रेप-हत्या प्रकरणातील आरोपी पॉलिग्राफ टेस्टमध्ये म्हणाला- चुकून सेमिनार रूममध्ये गेलो, डॉक्टरचा मृतदेह आधीच पडलेला होता
परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. महाविकास आघाडीचे नेते देखील पळपुटे आहेत. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीवर शरद पवार स्पष्ट भूमिका मांडत नाहीत. जरांगेंच्या मागणीला पाठिंबा की विरोध हे देखील सांगत नाहीत. पण जात बघून मतदान करणार असाल, तर तो सर्वांत मोठा धोका आहे. मराठ्यांना माझे सांगणे आहे, तत्व पाहिजे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे, पण शरद पवार तसे तत्त्वनिष्ठ नेते नाहीत. पवार भूमिका घेत नाहीत. ते भित्री भागूबाई झालेत. यशवंतराव म्हणजे शरद पवार यांच्यासारखे भित्री भागुबाई नेते नव्हते.
कोसळलेल्या पुतळ्यावर आणखी काही दिवस आवाज उठेल, मग पुन्हा सर्व शांत होईल. मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही तर घ्या आता 40 सैनिक मारले गेले, असे झाल्यावर रडता कशाला मग?? देशाची इभ्रत राखली जाईल, एवढी कुवत केंद्र सरकारमध्ये नाही. ही परिस्थिती भीषण आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App