Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; दहशतवाद्यांचा ड्रोन हल्ला

Manipur

दोन ठार, अनेकजण जखमी; एक पोलीस कर्मचारीही जखमी


विशेष प्रतिनिधी

इंफाळ : ईशान्येकडील मणिपूर ( Manipur  ) राज्य पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होरपळू लागले आहे. वास्तविक, शनिवारी गोळीबाराची घटना इंफाळ पश्चिममधील कांगचूप भागातील कोत्रुकजवळ घडली.



ज्यामध्ये एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात महिलेच्या मुलीसह अन्य चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही संशयितांनी येथे ड्रोन बॉम्बने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

कोतारुक गावचे ग्रामपंचायत अध्यक्ष सांगतात की, संशयित सशस्त्र अतिरेक्यांनी दुपारी दोनच्या सुमारास गोळीबार केला. कोणत्याही चिथावणीशिवाय हा गोळीबार करण्यात आला. गावातील स्वयंसेवक संवेदनशील भागापासून दूर असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.

Violence erupts again in Manipur Drone attack by terrorists

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात