Vanraj Andekar वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी त्या भागातील दिवे बंद करण्यात आले होते.
विशेष प्रतिनिधी
पुणे : Vanraj Andekar पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर असे मृत माजी नगरसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवकावर एकापाठोपाठ पाच गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, घरगुती वादातून वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठेतील डोके तालीमसमोर रात्री साडेआठच्या सुमारास गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागल्याने वनराज तेथेच पडले. वनराज आंदेकर यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
Haryana : हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली; 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान; निकाल 8 ऑक्टोबरला
पुण्याचा नेहमीच गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पेठेतील डोके तालमीसमोर ही घटना घडली. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी त्या भागातील दिवे बंद करण्यात आल्याची माहिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App