वृत्तसंस्था
कोलकाता : आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येप्रकरणी नागरी स्वयंसेवक संजय राय पोलिस कोठडीत आहे. मात्र, माजी प्राचार्य संदीप घोष ( Sandip Ghosh ) हे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसते. सीबीआय चार दिवसांपासून त्यांची चौकशी करत आहे. परंतु, घोष यांना ७ प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेहाबाबत माहिती मिळाल्यानंतर घोष यांनी इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सेमिनार हॉलमध्ये प्रवेश कसा दिला हे सांगत नाहीत. पुरावे जाणूनबुजून नष्ट केल्याचेही सीबीआयच्या तपासात समोर आले आहे.
सेमिनार हॉलमध्ये पोहोचलेल्यांनी आधी मृतदेहाला स्पर्श केला. त्यामुळे खोलीतील अनेक खुणा खराब झाल्या आहेत. घोष यांना खोलीत जाणाऱ्या लोकांबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांना दोन तास उशिरा का कळवण्यात आले हेही त्यांनी सांगितले नाही. घटनेच्या आठवडाभरापूर्वी घोष यांनी त्यांच्या फोनचे कॉल रेकॉर्ड आणि मेसेज डिलीट केल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेकांचे नंबरही फोनवरून काढले. सीबीआय आता फोनवरून हा डेटा रिकव्हर करत आहे. त्याच वेळी स्थानिक पोलिस सीबीआयच्या घेऱ्यात आहेत. कारण त्यांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला नव्हता.
बंगाल सरकारने रुग्णालयाबाहेर कडक बंदोबस्त लागू केला आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला गरजेशिवाय आणि पुराव्याशिवाय प्रवेश करण्यास मनाई आहे. सीबीआयची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी मृताच्या पालकांनी त्यांच्या मुलीची हत्या झाल्याचे एका टीमला सांगितले होते. हे एक मोठे षड््यंत्र आहे. तपास यंत्रणेला काही तपशील हवे होते त्यामुळे पुन्हा चौकशी केली. त्यांना विचारले की, या घटनेमागे काही मोठे षड््यंत्र आहे असे त्यांना कसे वाटले?
1. डॉक्टरचा मृत्यू आत्महत्या म्हणून घोषित करण्याची घाई का होती? 2. तुम्ही डॉक्टर आहात, गुन्ह्याचे ठिकाण सुरक्षित ठेवणे आवश्यक वाटत नव्हते? 3. पीडितेच्या कुटुंबीयांना चुकीची माहिती देण्याचा सल्ला कोणी दिला? 4. घटनास्थळी पुराव्याशी छेडछाड करणे हा गुन्हा आहे, ती जागा सुरक्षित का ठेवली नाही? 5. कुटुंबाला उिशरा का कळवले? 6. पीडीतेच्या कुटुंबीयांना मृतदेह दाखवण्यास उशीर का? 7. घटनेनंतर लगेच राजीनामा का? अत्याचार अपहरण छळ अवमान विनयभंग हुंडा इतर
जाणीवपूर्वक पुरावे मिटवण्याचे पुरावे मिळाले
देशात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, गेल्या ५ वर्षांत देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. महिला आणि पुरुष अहवाल 2023 च्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये देशात 3,59,849 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली होती, जी 2018 मध्ये 3.7 लाख, 2019 मध्ये 4 लाख, 2020 मध्ये 3.7 लाख, 2021 मध्ये 4.2 लाख झाली. त्यानंतर 2022 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांची संख्या 4,45,000 झाली. देशात दर तासाला ५१ महिलांवरील गुन्ह्यांची नोंद होत आहे. त्याच वेळी दररोज सरासरी 1220 महिला गुन्हेगारीला बळी पडतात. अहवालात म्हटले आहे की महिलांवरील एक तृतीयांश गुन्ह्यांमध्ये त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा समावेश आहे. नोंद झालेल्या प्रकरणांपेक्षा वास्तविक प्रकरणे यापेक्षा जास्त असू शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App