विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरातील आदर्श शाळेत 4 वर्षांच्या आणि 6 वर्षांच्या चिमुकल्यांवर तिथला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात संतापाची लाट उसळली. शाळेबाहेर मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी मागणी केली. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतका मोठा गुन्हा घडल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला 12 तास का लावले??, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला असून आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा विषय लावून ठेवण्याचं, या विषयात लक्ष घालणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले :
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले?? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी हा कुठला हलगर्जीपणा करायचा?? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या!!
बदलापूर शहरातील शाळेत लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात जनता रस्तावर उतरली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शाळेबाहेर आंदोलन करण्यासह लोकांनी रेल्वे रुळावर उतरुनही आंदोलन केलं. रेलरोको आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी जमावाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.
दुसरीकडे शाळेबाहेर लोकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. लोकांनी शाळेत घुसत शाळेची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर आता सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App