विशेष प्रतिनिधी
अजमेर : अजमेमध्ये 1992 मध्ये सेक्स स्कँडलचा Ajmer sex scandal तब्बल 32 वर्षांनी निकाल लागला आहे. पाॅस्काे काेर्टाने ऐतिहासिक निकाल देत तीन माजी काॅंग्रेस नेत्यासह सहा आरोपींना दोषी घोषित केले आहे. 1992 मध्ये आरोपींनी अजमेरच्या प्रसिद्ध मेयो कॉलेजमधील 100 हून अधिक विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्कार केला. त्यांची छायाचित्रे वापरून त्यांना ब्लॅकमेल केले हाेते. न्यायालयाने नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीन हुसैन यांना गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. या प्रकरणात अजमेरमधील प्रतिष्ठित खादिम कुटुंबातील तरुणांनी हे घृणास्पद कृत्य केले हाेते.अजमेर शरीफ दर्ग्याचे संरक्षक असलेल्या खादिम कुटुंबातील तरुण हे त्या काळात स्थानिक सेलीब्रिटींप्रमाणे वागत. त्या काळात अप्रूप असलेल्या उघड्या जीप, अॅम्बेसेडर आणि फियाट कारमधून फिरत. Ajmer sex scandal verdict after 32 years
जीम करून तब्येत कमावलेले, गळ्यात सोन्याच्या साखळ्या आणि संजय दत्तप्रमाणे केस वाढविलेले हे तरुण युवक कॉँग्रेसचे नेते होते. यातील एका मुलीवर तर कॉँग्रेसमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने बलात्कार झाला होता.पत्रकारांनी या घटनेचा पाठपुरावा केला. त्यामुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण होऊन बंदही पुकारण्यात आला होता. स्थानिक माध्यमांमध्ये सुरूवातीला आलेल्या वृत्तानुसार आयएएस- आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुली असल्याचे म्हटले होते. परंतु, या मुली मध्यमवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील होत्या. या घटनेमुळे अनेक कुटुंबांना शहर सोडून परागंदा व्हावे लागले.
मात्र, तरीही या मुलींच्या मागचा दुर्दैवाचा फेरा चुकाला नाही. पोलीसांनी आपल्या नोंदीमध्ये पीडितांची नावे आणि सरकारी वसाहतीतील त्यांचे पत्तेही नोंदविले होते. माध्यमांपर्यंत त्यांची नावे पोहोचली. फारुख आणि नफीस हे दोघेही अजमेरमधील युवक काँग्रेसचे नेते होते. प्रचंड पैसा आणि राजकीय ताकदीमुळे ते मस्तवाल झाले होते. शाळकरी मुली म्हणजे त्यांना आपली मालमत्ता वाटे.
त्यावेळी क्राईम रिपोर्टर असलेल्या संतोष गुप्ता या पत्रकाराने सांगितलेल्या एका प्रसंगानुसार, दोघे जीप घेऊन एलिट नावाच्या हॉटेलवर गेले होते. तेथे काही शाळकरी मुली बसल्या होत्या. त्यांच्यापैकी एकाने रेस्टॉरंट मॅनेजरला फोन केला आणि त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने सर्वांना आईस्क्रीम वाटण्यास सांगितले. त्या मुलींवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी हे केले होते.केवळ पैशाच्याच नव्हे तर राजकीय ताकदीवरही त्यांनी अनेक मुलींचे शोषण केले. यातील गीता नावाच्या तरुणीची कथा तर अंगावर शहारे आणणारी आहे. त्या काळात गॅस कनेक्शन ही मोठी गोष्ट असायची. त्याचबरोबर गीताला राजकारणात यायचे होते.
Supreme Court : केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले तीन तलाक घातक, मुस्लिमांनी हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत
बारावीत शिकणाऱ्या गीताने यासाठी अजय नावाच्या ओळखीच्या तरुणाला याबाबत विचारले.त्याने नफीस आणि फारुख चिश्ती यांच्याशी ओळख करून दिली. तिच्यावर जाळे टाकत या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आपल्या मित्रांशीही संबंध ठेवण्यास बळजबरी केली. ऐवढेच नव्हे तर तिने आपल्या मैत्रीणीांनाही आपल्याकडे आणावे यासाठी तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. गीताने आपल्या साक्षीत सांगितले होते की, त्यांनी तिला कॉँग्रेसमध्ये पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यासाठी फॉर्म भरायला दिला. तिचा फोटोही मागितला. एके दिवशी ती शाळेत जात असताना नफीस आणि फारूकने तिला अडवले आणि तिला लिफ्ट देऊ केली. ती विश्वासाने त्यांच्यासोबत गेली. पण तिला शाळेत नेण्याऐवजी एका फार्महाऊसवर आणले.
नफीसने तिच्यावर हल्ला करत बलात्कार केला. आपण सांगू तसे न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गीता अनेक मुलींना फार्महाऊसवर किंवा फारुख नावाच्या तरुणाच्या बंगल्यावर आणले. याठिकाणी मुलींवर सामूहिक बलात्कार केले जात. बलात्कार करतानाचे फोटोही काढत. त्यामुळे या मुलींना कायम ब्लॅकमेल करणे शक्य होई.धक्कादायक म्हणजे गीता आणि तिच्याबरोबरच्या आणखी एक पीडित मुलगी कृष्णबाला यांनी या सगळ्या प्रकाराला कंटाळून एका पोलीस हवालदाराशी संपर्क साधला. त्यांनी अजमेर पोलिसांच्या विशेष शाखेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याशी त्यांची ओळख करून दिली.त्यांनी ब्लॅकमेल केलेले फोटो परत मिळविण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले, परंतु लवकरच दोघींना धमकीचे कॉल आले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क का केला असे विचारले.
एकदा कॉन्स्टेबलने तिला आणि कृष्णबालाला अजमेर शरीफ दर्गा परिसरातून त्यांचे फोटो परत करण्यासाठी म्हणून नेले. तेथे पोलिसांसमोरच या टोळीतील एकाने त्यांना धमकावले. अजमेर शरीफ दर्ग्याच्या खादिम (संरक्षक) कुटुंबातील फारूक, नफीस, चिश्ती बंधू आणि त्यांच्या मित्रांच्या टोळीने अनेक मुलींवर केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी ३2 वर्षांपासून सुरू हाेती. शालेय विद्यार्थीनी असताना बलात्काराला बळी पडलेल्या एका महिलेने ३० वर्षांनंतर पुन्हा सुनावणी सुरू असताना आता मी आजी झाली आहे. माझ्या मुलाबाळांना काय सांगू असे म्हणत आता तरी एकटे सोडा अशी आर्त विनवणी न्यायालयात केली हाेती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App