Sanjay Raut : अजितदादांना सोडून बाकीच्यांना पवार घेणार आपल्या राष्ट्रवादीत; संजय राऊतांनी पेरला अजितदादांच्या गोटात सुरुंग!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुतीच्या सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांबाबत फारच सॉफ्ट झाल्यामुळे ते सत्तेची वळचण बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच शरद पवारांच्या जवळचे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य करून अजितदादांच्या गोटात सुरुंग पेरला. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे की नाही हा पवारांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु माझे शरद पवारांची अनेकदा बोलणे झाले त्यानुसार अजितदादा सोडून पवार बाकीच्यांना आपल्या पक्षात घेतील. अजितदादांना ते कधीच घेणार नाहीत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी करून अजितदादांच्या गोटात सुरुंग पेरला. sanjay raut target ajit pawar

अजितदादांनी काल एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते शरद पवारांबद्दल खूपच सॉफ्ट बोलले भविष्य काळातल्या राजकारणाविषयी काही संकेत दिले. त्या पार्श्वभूमीवर अजितदादा महायुतीतून बाहेर पडण्याची चर्चा सुरू झाली. ते सत्तेची ओळख आणि बदलणार असल्याचे बोलले जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अजित दादा सोडून बाकीच्यांना शरद पवार आपल्या राष्ट्रवादीत घेणार हे वक्तव्य केल्याने अजितदादांच्या गोटात खळबळ निर्माण झाली.

– संजय राऊत म्हणाले :

आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढू. महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याला मुंबईत आज तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. आजच्या मेळाव्याच यजमानपद शिवसेनेकडे आहे. तिन्ही पक्षांत एकवाक्यता आहे. जागा वाटपाबाबत मतभेद नाहीत. आम्ही तिघांनी ठरवलेले आहे, कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये मविआ सरकारला सत्तेवर बसवायचं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख दिल्लीत होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक बैठका झाल्या. शरद पवार, राहुलजी, खर्गे, सोनियाजी यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत एकच मुख्य मुद्दा होता, एकत्र लढायचं. एकत्र काम करायचं. महाराष्ट्रातून दरोडेखोरांच्या सरकारला हटवायचे.

आज आम्ही रणशिंग फुंकतोय. आज सुरुवात होईल. त्यानंतर पुढचे तीन महिने निवडणुका होईपर्यंत महाराष्ट्रात प्रचाराच एकत्र सूत्र पुढे नेऊ. लाडक्या बहिणींचा नाही तर जनतेच्या पैशातून निवडणुकीचा प्रचार सुरु आहे.

ज्याचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना हफ्तेबाजीवर पोसलं गेलं इथून थैल्या गोळा करुन दिल्लीच्या चरणी वहायच्या आणि आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल काय बोलायचं? 50-100 कोटी कुठून आणले? त्याच पैशांनी आमदार, खासदार, नगरसेवक, न्याय विकत घेतात. हे कष्टाच्या पैशावर होत नाही, अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं जनता बोलेल.

अजित पवार घरातच कुस्ती करणार

बारामतीकरांनी लोकसभेला अजित पवारांना पिळून काढलं. त्यांचा रस निघाला. आता पुतण्याविरुद्ध कर्जत-जामखेडमध्ये लढू शकतात. अजित पवार घरातच लढणार. कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध. ते घरातच लढणार. घरातल्या घरातच कुस्ती करणार. पण शरद पवार आता अजित पवारांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणार नाहीत अजितदादा सोडून बाकीच्यांना पक्षात घेऊ शकतील.

sanjay raut target ajit pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात