Baba Bageshwar : ‘ज्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण येते त्यांनी देश सोडावा’

Baba Bageshwar

बाबा बागेश्वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचं विधान!

विशेष प्रतिनिधी

छतरपूर : बाबा बागेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेले पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री  Baba Bageshwar यांनी गुरुवारी सांगितले की, ज्यांना वंदे मातरम म्हणण्यात अडचण येते त्यांनी देश सोडावा. स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापनदिनानिमित्त छतरपूर जिल्ह्यातील राजनगर येथील आपल्या शाळेत पोहोचलेल्या धीरेंद्र शास्त्री यांनी तेथे तिरंगा फडकावला. ते म्हणाले, “‘हर घर तिरंगा अभियान’ हे देशासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देतो. पण, काही जणांना वंदे मातरम म्हणण्यात अडचण येते, त्यांनी देश सोडावा.”

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबा बागेश्वर म्हणाले की, आज येथे येऊन खूप बरे वाटत आहे, कारण ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, शाळेत आल्याने जुन्या आठवणी आल्या. त्यांनी खान सरांना मीडियासमोर आणले. शास्त्री म्हणाले, “आम्हाला त्यांनी शिक्षण दिले. मी लहानपणापासून त्यांच्यावर प्रेम करतो.”

Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!

देशातील तरुणांना आवाहन करून ते म्हणाले की, तुम्ही कुठे अभ्यास करता हे महत्त्वाचे नाही, तुम्ही कसे विचार करता हे महत्त्वाचे आहे. तुमची विचारसरणी चांगली असेल तर तुम्ही नक्कीच राष्ट्राचे भले कराल. तसेच, “माझ्यासाठी यापेक्षा मोठा अभिमान काय असेल – ज्या ठिकाणी मी माझे शिक्षण घेतले, त्याच ठिकाणी येणे. त्यामुळे असे काहीतरी करा की एक दिवस तुम्हाला तुमच्या शाळेत झेंडा फडकवण्याची संधी मिळेल.” केंद्रातील मोदी सरकार राबवत असलेली ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम अप्रतिम आहे, देश सर्वोपरि आहे, असे ते म्हणाले. देश नसेल तर काही नाही. देश खूप महत्त्वाचा आहे.

Baba Bageshwar Dhirendrakrishna Shastri said Vande Mataram will be chanted

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात