माइक बंद केल्याचा कांगावा, नीती आयोगाच्या बैठकीतून ममता बॅनर्जी निघून गेल्या; पण निर्मला सीतारामन यांनी खोडला ममतांचा दावा!!

Mamata Banerjee left the Niti Aayog meeting

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निती आयोगाच्या बैठकीत आपल्याला बोलू दिले नाही इतर मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटांचा वेळ दिला. पण आपल्याला फक्त 5 मिनिटांचा वेळ देऊन आपण पश्चिम बंगालच्या मागण्या पुढे करत असताना आपला माईक बंद केला, असा कांगावा करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर निघून गेल्या. बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांकडे वर उल्लेख केलेली तक्रार केली. मात्र, ममता बॅनर्जींचा हा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला आहे.Mamata Banerjee left the Niti Aayog meeting

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक सभागृहामध्ये नीती आयोगाची बैठक सुरू आहे. 2047 विकसित भारत हा या बैठकीचा अजेंडा आहे. या बैठकीवर “इंडी” आघाडीच्या घटक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातला आहे, पण ममता बॅनर्जी या बैठकीला हजर होत्या. त्या बैठकीमध्ये इतर सर्व मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटे बोलण्याची मूभा दिली होती. पण आपल्याला फक्त 5 मिनिटांचा वेळ दिला.

पश्चिम बंगालच्या मागण्या मांडत असताना आपला माईक बंद केला. त्यामुळे आपण बैठकीतून बाहेर निघून आलो, असा दावा ममता बॅनर्जी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. नीती आयोगाकडे कोणतेही आर्थिक अधिकार नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मात्र नीती आयोगाच्या बैठकीला हजर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ममता बॅनर्जींचा तो दावा खोडून काढला. ममता बॅनर्जींचा माईक बंद केला नव्हता. प्रत्येक मुख्यमंत्र्याला जेवढी वेळ दिली, तेवढीच वेळ ममता बॅनर्जींना बोलायला दिली होती. ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेत. त्यांनी खरं बोललं पाहिजे, अशा शब्दांमध्ये सितारामन यांनी ममता बॅनर्जींच्या वक्तव्याचे वाभाडे काढले.

Mamata Banerjee left the Niti Aayog meeting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात