महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात असल्याचेही सांगितले आहे. Due to heavy rains many dams across the state are releasing Deputy Chief Minister Fadnavis watching
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात अनेक भागात मोठा पाऊस सुरू असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकार्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
खडकवासला धरणातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे.
तसेच कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. सिंचन विभागात सातत्याने जिल्हाधिकार्यांशी संपर्कात आहे.
याशिवाय महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. 517.5 मीटर इतकी पाणीपातळी (एफआरएल) कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे. अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App