विकासाच्या नावाखाली नदीपात्रात सिमेंटचे रस्ते, फुटपाथ वर पेव्हर ब्लॉक, सोसायट्या आणि घरे; पुण्याच्या पावसात सगळे बुडे!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : विकासाच्या नावाखाली पुण्यात नदीपात्रात सिमेंटचे रस्ते फुटपाथ वर ब्लॉक सोसायटी आणि घरे; पावसाच्या पाण्यात सगळे बुडे!!, अशी पुण्याची सध्याची अवस्था आहे. पुण्यात प्रचंड पाऊस झाल्याने नदीकाठची घरे आणि सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांना एयरलिफ्ट करण्याची वेळ आली आहे. Due to heavy rains in Pune, houses and societies on the banks of the river have gone under water

पावसाच्या पाण्यात पुणे का बुडले??, याचे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगून प्रशासनावर आगपाखड केली. पुण्यात सखल भागातले पाणी जायला काही ठेवलेच नाही. सगळीकडे सिमेंटचे रस्ते पेव्हर ब्लॉक बसवून ठेवले आहेत. त्यामुळे पाणी साचले, असा ठपका दोन्ही नेत्यांनी ठेवला, पण आपल्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी त्याची कंत्राटे दिली होती, हे मात्र दोन्ही नेत्यांनी साळसूदपणे लपवून ठेवले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या :

पुण्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि भयानक आहे. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा मंत्री पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असं बोलत आहेत. सर्व यंत्राणा कामाला लागली आहे. त्याबद्दल मी मंत्र्यांचे आभार मानते. परंतु नियंत्रणात काहीही नाही. लोक पॅनिक झाले आहेत. लोकांकडे खाण्यासाठी-पिण्यासाठी काहीही नाही.

पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नाही

पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले की, नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं. मी नेहमी सांगते, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नको. गेले अनेक वर्षे प्रशासनाकडून इन्फ्रास्ट्रक्चरची काम झालेली आहे, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपायोजना करण्यासंदर्भात आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. अजित पवार तातडीने पुण्याला देखील रवाना झाले.

खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही अजित पवारांनी केले.

Due to heavy rains in Pune, houses and societies on the banks of the river have gone under water

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात