
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घेत केंद्रातल्या मोदी सरकारने 2024 25 च्या आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात युवक, शेतकरी, महिला आणि गरिबांसाठी भरीव तरतुदी करून अर्थसंकल्पाची परिभाषा गरीब आणि मध्यम वर्गाला रुचणारी आणि पचणारी केली. त्याचबरोबर सरकारने नोकरदारांचीही बूज राखली आहे. UnionBudget2024 : personal income tax rates in new tax regime
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या Income Tax Slab विषयी घोषणा केली. जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे 17500 रुपये वाचणार आहेत.
#WATCH | On personal income tax rates in new tax regime, FM Sitharaman says, "Under new tax regime, tax rate structure to be revised as follows – Rs 0-Rs 3 lakh -Nil; Rs 3-7 lakh -5% ; Rs 7-10 lakh-10% ; Rs 10-12 lakh-15%; 12-15 lakh- 20% and above Rs 15 lakh-30%." pic.twitter.com/zQd7A4OsnT
— ANI (@ANI) July 23, 2024
याशिवाय, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50000 वरुन 75000 पर्यंत वाढवण्यात येणार आहे, तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15000 वरुन 25000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नवा इन्कम टॅक्स स्लॅब
- 3 लाख रुपये : कोणताही कर नाही
- 3 लाख ते 7 लाख रुपये : 5 %
- 7 लाख ते 10 लाख रुपये : 10 %
- 10 लाख ते 12 लाख : 15 %
- 12 लाख ते 15 लाख : 20 %
- 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न : 30 %
#WATCH | On personal income tax rates in new tax regime, FM Sitharaman says, "Under new tax regime, tax rate structure to be revised as follows – Rs 0-Rs 3 lakh -Nil; Rs 3-7 lakh -5% ; Rs 7-10 lakh-10% ; Rs 10-12 lakh-15%; 12-15 lakh- 20% and above Rs 15 lakh-30%." pic.twitter.com/zQd7A4OsnT
— ANI (@ANI) July 23, 2024
UnionBudget2024 : personal income tax rates in new tax regime
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!