वृत्तसंस्था
जोधपूर: माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांचे तत्कालीन अधिकारी यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप ऑनलाइन समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने रविवारी टीका केला. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गेहलोत यांच्यावर सरकार वाचवण्यासाठी बेकायदेशीर ‘फोन टॅपिंग’चा अवलंब केल्याचा आरोप केला.Ashok Gehlot did illegal phone tapping to save his government Gajendra Singh Shekhawat
गेहलोत यांचे तत्कालीन OSD लोकेश शर्मा यांनी एप्रिलमध्ये पत्रकार परिषदेत त्यांच्या आणि गेहलोत यांच्यातील संभाषणाचे कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवले होते. 2020 मध्ये राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी शेखावत आणि काही काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या कथित टेलिफोन संभाषणाची क्लिप त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पेन ड्राईव्हमध्ये दिल्याचा दावा त्यांनी केला होता.
शेखावत यांनी दिल्लीत दाखल केलेल्या बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणातील शर्मा आरोपी आहे. गेहलोत आणि शर्मा यांच्यातील कथित संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग नुकतेच सोशल मीडियावर समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेखावत रविवारी म्हणाले, “माजी मुख्यमंत्र्यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी फोन टॅपिंगचा अवलंब केला होता. त्यांनी फोनवरील संभाषण रेकॉर्ड केले आणि ते सार्वजनिक करण्यासाठी पेन ड्राइव्हवर ‘सेव्ह’ केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App