ट्रम्पच्या दिशेने जाणाऱ्या बंदुकीच्या गोळीचाही टिपला फोटो!

जाणून घ्या, कोण आहे अप्रतिम फोटोग्राफर?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांना शनिवारी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास अमेरिकन वेळेनुसार गोळी लागली, जी त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागातून गेली. ट्रम्प यांच्यावर हा हल्ला पेनसिल्व्हेनियातील त्यांच्या निवडणूक रॅलीदरम्यान करण्यात आला आणि जेव्हा गोळी झाडण्यात आली, तेव्हा एका छायाचित्रकारानेही ट्रम्प यांच्या दिशेने जाणारी गोळी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या दिशेने येणारी बंदुकीची गोळई हा फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे.The photo of the gun shot towards Trump!



द न्यूयॉर्क टाइम्सचे ज्येष्ठ छायाचित्रकार डग मिल्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळून बाहेर पडलेल्या या आयकॉनिक बुलेटचे छायाचित्र क्लिक केले आहे. डग मिल्स यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, “माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी त्यांच्या मुठी घट्ट पकडत होते, परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांचा चेहरा लाल झाला आणि फिकट गुलाबी झाला आणि त्यांच्या चेहऱ्याच्या बाजूला रक्त दिसत होते.”

सीएनएनशी संवाद साधताना डग मिल्स म्हणाले, “मला माहित नव्हते की हा गोळीचा आवाज आहे कारण मी असा आवाज कधीच ऐकला नव्हता, परंतु जेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक खाली, खाली बस म्हणत होते, तेव्हा मला कळले.” की, माझी पहिली प्रतिक्रिया स्टेजजवळ जाऊन फोटो काढण्याची होती, जिथे त्यांनी मुठ आवळली होती आणि सीक्रेट सर्व्हिस त्यांना स्टेजवरून घेऊन जात होती.”

जेव्हा त्याला विचारले की त्याने हा फोटो कॅप्चर केला आहे हे माहित आहे होते का, तेव्हा ते म्हणाले, “मी सुरुवातीला हा फोटो शूटिंगनंतर पाठवला होता आणि मला याबद्दल काहीच माहिती नव्हती पण नंतर मला याची माहिती मिळाली.”

The photo of the gun shot towards Trump!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात