अमित शाह यांनी अधिसूचनेची दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली. गृहमंत्री अमित शाह यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली.In remembrance of the ancestors 25th June is celebrated as Constitution Murder Day
अमित शाह यांनी ट्विट केले की, ’25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस आपल्याला 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाची आठवण करून देईल.
त्यांनी पुढे लिहिले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा उद्देश आहे, ज्यांनी हुकूमशाही सरकारच्या अनेक अत्याचारांना तोंड देऊनही लोकशाही पुनरुज्जीवित करण्यासाठी लढा दिला . ‘संविधान हत्या दिन’ लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्यासाठी कार्य करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App