काँग्रेसचा हात, गोवंश कत्तलीला साथ; खासदार शोभा बच्छावांचा ऑडिओ; पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघांच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांनी ईदच्या कुर्बानी साठी गोवंशाला सोडून द्यावे, असा दबाव पोलिसांवर आणल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. यासाठी त्यांनी शोभा बच्छाव आणि मालेगावातील एका व्यक्तीच्या संभाषणाचा ऑडिओ शेअर केला आहे.Congress hand, support for cow slaughter; Audio of MP Shobha Bachhav; Accused of putting pressure on the police

बकरी ईदच्या निमित्ताने शोभा बच्छाव यांनी गोवंश कत्तलीसाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप करून या संदर्भात भाजपने ट्विटवर शोभा बच्छाव यांची कथित ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे. मात्र या ऑडिओमधील आवाज शोभा बच्छाव यांचाच आहे, याची आम्ही पुष्टी करत नाही, असे मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले आहे.



मात्र या ऑडिओसह भाजपने टीका केली आहे. ”काँग्रेसच्या हाताची गोवंश कत्तल ला साथ…धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांचा गोवंश कत्तली साठी प्रशासनावर दबाव अयशस्वी मात्र ही VOTE जिहादची परतफेड आहे का? हिंदूंच्या भावनांना आव्हान देण्याचे काम करत मतांसाठी धार्मिक तुष्टीकरण करणे काँग्रेसचा हा अजेंडा जनतेने आता ओळखला आहे”, असे भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऑडिओमध्ये नेमके काय?

भाजपाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नगरसेवकांचे बंधू अब्दुल लतीफ डॉन आणि धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांचा आवाज असल्याचे भाजपने नमूद केले आहे. यामध्ये अब्दुल लतीफ डॉन शोभा बच्छाव यांच्याशी बोलताना त्यांना आई म्हणत रडत त्यांना करोडो रुपयांचा जनावरांचा माल सोडून द्या मिलिटरी वाल्यांना सांगा पोलिसांना सांगा, असे सांगत असल्याचे ऐकू येत आहे. ईद नंतरचे दोन दिवस गेले, तर कुर्बानी करता येणार नाही, असेही अब्दुल लतीफ डॉन शोभा बच्छाव यांना सांगत असल्याचे ऐकू येत आहे. त्यावर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असून त्यांच्याशी परत बोलू, असे आश्वासन शोभा बच्छाव देत असल्याचेही ऐकू येत आहे.

या व्हिडिओ क्लिप संदर्भात शोभा बच्छाव यांनी अद्याप तरी कुठलाही खुलासा केलेला दिसत नाही.

Congress hand, support for cow slaughter; Audio of MP Shobha Bachhav; Accused of putting pressure on the police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात