मार्च तिमाहीत जीडीपी 7.8 टक्के दराने वाढला, आकडेवारी आली समोर

March quarter GDP increased by 7.8 percent figures released soon

गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.2 टक्के नोंदवला गेला होता March quarter GDP increased by 7.8 percent figures released soon

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाचा आज शेवटचा दिवस आहे. काल म्हणजेच मतदानाच्या एक दिवस आधी अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक चांगली बातमी समोर आली. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.2 टक्के नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 24 च्या शेवटच्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वेगाने वाढले आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.

मार्च महिन्यात देशाचा जीडीपी 7.8 टक्के दराने वाढला आहे. केंद्राने आर्थिक वर्ष 24 साठी एकूण विकास दर 8.2 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) अंदाज 6.9 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

24 मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 648 अब्ज डॉलर होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 2 डॉलर बिलियनची थोडीशी घट झाली आहे. चौथ्या तिमाहीत सकल घरेलू उत्पादनाचा विकास दर 7.8 टक्के होता, तर आर्थिक वर्ष 24 मधील जीडीपी वाढीचा दर 8.2 टक्के होता. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अशाप्रकारे, चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे.

March quarter GDP increased by 7.8 percent figures released soon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात