खळबळजनक! ‘या’ जिल्ह्यात निवडणूक ड्युटीवर गेलेल्या 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अनेकांची प्रकृती चिंताजनक, जाणून घ्या नेमकं काय कारण?


विशेष प्रतिनिधी

मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात निवडणूक ड्युटीवर असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मिर्झापूरमध्ये कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे 6 होमगार्ड, 1 आरोग्य विभाग कर्मचारी, 1 एकत्रीकरण अधिकारी आणि 1 आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याचा निवडणूक ड्युटीवर असताना मृत्यू झाला.9 employees who went on election duty died in Mirzapur district of Uttar Pradesh



तर 20 होमगार्डना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी होणाऱ्या मतदानासाठी विविध जिल्ह्यातून होमगार्ड इलेक्शन ड्युटीवर आले होते. मृत पोलिंग पार्टीला जाण्याऐवजी पॉलिटेक्निकच्या मैदानावर पोहोचले होते. आजारी पडल्यानंतर त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

निवडणूक ड्युटीसाठी इतर जिल्ह्यातून सर्व होमगार्ड मिर्झापूरला पोहोचले होते. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पोहोचताच ते एकामागून एक बेशुद्ध होऊ लागले. कॉलेजमधूनच पोलिंग पार्टी निघाली होती.

मोठ्या संख्येने होमगार्डची प्रकृती खालावलेली पाहून त्यांना तत्काळ विभागीय रुग्णालयात असलेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले, तेथे उपचारादरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये होमगार्ड रामजीवन, सत्य प्रकाश, त्रिभुवन, रामकरण, बचराम यांचा समावेश आहे. याशिवाय 20 होमगार्डवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

9 employees who went on election duty died in Mirzapur district of Uttar Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात