दोन्ही राष्ट्रवादींची आपापल्या आघाड्यांमध्ये दमबाजी; वेळे आधीच आकड्यांचे पत्ते खोलून काका – पुतण्यांनी करून घेतली गोची!!

नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींची आपापल्या आघाड्यांमध्ये दमबाजी वेळे आधीच आकड्यांचे पत्ते खोलून काका – पुतण्यांनी करून घेतली गोची!!, असेच म्हणायची वेळ पवार काका पुतण्याच्या पक्षांनी स्वतःवर ओढवून घेतली आहे.Both NCP will get beating in their respective alliance in assembly seats distribution

लोकसभा निवडणुकीतले महाराष्ट्रातले फक्त मतदान संपले आहेत मतमोजणी अद्याप बाकी आहे त्यामुळे कुठला पक्ष किती जागांवर निवडून येतो??, हे अजूनही मतदान यंत्रांमधल्या गुलदस्त्यातच बंद आहे, पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाशिंग बांधून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारी चालवली आहे.



तीनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी सूचकपणे वक्तव्य करून लोकसभेला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागा घेतल्या, पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून लोकसभेसारख्या कमी जागा घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राहुल गांधींची काँग्रेस यांना दिला. फक्त पवारांनी ही दमबाजी करताना आपला नेमका आकडा उलगडून सांगितला नाही. पवारांनी आपल्या राष्ट्रवादीचा विधानसभेचा आकडा गुलदस्त्यात ठेवला.

पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र तेवढा संयम आज दिसला नाही. तो संयम वयाने सगळ्यात ज्येष्ठ असलेले नेते छगन भुजबळ यांनाच राखता आला नाही. अजित पवारांनी गरवारे क्लब मध्ये बोलावलेल्या चिंतन बैठकीत छगन भुजबळ यांनी अजितदादांचा विधानसभेचा आकडा फोडला. भाजपने म्हणे राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत महायुतीस 80 90 जागा देण्याची कबुली दिली आहे, असे छगन भुजबळ यांनी परस्पर जाहीर करून टाकले. त्यामुळे अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात 80 ते 90 जागा लढवणार असल्याचा आकडा फुटला. यातून महायुतीमध्ये छगन भुजबळ यांनी आकडेमोडीची अस्वस्थतेची काडी टाकली.

अजून लोकसभेचा निकाल लागायचा आहे. तरी देखील दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या आघाडीत असे दमबाजी करत आहेत. आता महाविकास आघाडीत शरद पवारांची दमबाजी पर्सेप्शन लेव्हलवर तरी चालते, पण महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असोत त्यांची दादागिरी पर्सेप्शन लेव्हलला तरी चालेल का??, याविषयी दाट शंका आहे. कारण महाविकास आघाडीत शरद पवारांचा मुकाबला उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची आहे. तिथे पवारांच्या ज्येष्ठतेचा मुद्दा खपून जातो. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे नेते किंवा काँग्रेसचे नेते पवारांना निदान उलट बोलत नाहीत, पण स्वतःची कृती करायची सोडत नाहीत. म्हणूनच पवारांनी कितीही म्हटले की आम्ही राष्ट्रवादी पक्षाला लोकसभा निवडणुकीत कमी जागा घेतल्या तरी प्रत्यक्षात पवारांच्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि राहुल गांधींच्या काँग्रेसने वाटाघाटीच्या टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर ढकलले होते, ही वस्तुस्थिती लपत नाही.

तसेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अजित पवार महायुती पिछाडीवर ढकलले गेले ही वस्तुस्थिती लपलेली नाही. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निदान लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून डबल डिजिट म्हणजे 10 जागा तरी लढवायला मिळविल्या, पण महायुतीत अजित पवारांना सिंगल डिजिट वरच समाधान मानावे लागले. त्यातही ज्या 5 जागा मिळाल्या, त्यातल्या 4 घड्याळावर आणि 1जागा शिट्टीवर लढवावी लागली. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आकडेमोडीची दमबाजी भाजप सारखा पक्ष सहन करेल की करणार नाही हा खरतंर प्रश्नच उद्भवत नाही!!

पण ज्या छगन भुजबळांनी आपल्याला भाजपच्या अतिवरिष्ठांचा पाठिंबा आहे असे सांगूनही राष्ट्रवादीचे तिकीट लोकसभेसाठी मिळवता आले नाही, ते छगन भुजबळ भाजपला 80 – 90 जागांसाठी दमदाटी करायला निघाले, हे चित्र मात्र अजितदादांच्या पक्षाची नजीकच्या भविष्यात गोची करणारी असणार आहे हे उघड दिसते आहे.

Both NCP will get beating in their respective alliance in assembly seats distribution

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात