वृत्तसंस्था
अमरावती : पुण्यातील पब संस्कृतीचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाच अमरावती जिल्ह्यालगत रेव्ह पार्टी उजेडात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 11 महिलांसह 34 पुरुषांना अटक केली आहे. हे सर्वजण मध्य प्रदेशच्या हद्दीतील एका रिसॉर्टवर वॉटरपार्कमध्ये अश्लील गाण्यांवर डान्स करत होते. अटक करण्यात आलेल्या महिला नागपूरच्या असल्याची माहिती आहे.Rave party on Madhya Pradesh border near Amravati; 45 people including 11 young women arrested for obscene dance
मध्य प्रदेशच्या मुलताई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या वरूडपासून काही अंतरावर मध्य प्रदेशातीली जंगलातील नेचर प्राईड व वॉटरपार्कवर ही कारवाई झाली. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना या रिसॉर्टमध्ये मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. तिथे काही तरुण, तरुणी अश्लील गाण्यांवर नृत्य करत होते. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी नशेच्या धुंदीत असणारे हे सर्वजण वॉटर पार्कमध्ये होते. अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी महाराष्ट्रातील वरुड, नागपूर व अमरावती भागातील आहेत.
काय म्हणाले पोलिस?
मुलताई पोलिस अधीक्षक निश्चल झारिया या कारवाईची माहिती देताना सांगितले की, सदर रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची खबर आम्हाला मिळाली होती. त्यानुसार या प्रकरणी 45 जणांवर कारवाई करण्यात आली. यात 11 तरुणींचाही समावेश आहे. घटनेचा पुढील तपास सु रू आहे. हे रिसॉर्ट महाराष्ट्रातील व्यक्तीच्या नावे असून, तिथे अनैतिक कारवाया सुरू होत्या.
रिसॉर्ट मालक अमरावतीचा
या रिसॉर्टचा मालक अमरावतीच्या वरूडचा आहे. तिथे ग्राहकांसाठी काही छोटी फार्म हाऊस बांधण्यात आली आहेत. ती भाडेतत्वावर दिली जातात. पोलिस या प्रकरणाचा सर्वच बाजूंनी तपास करत आहेत. हे रिसॉर्ट मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे तिथे दोन्ही राज्यांतील नागरीक मोठ्या संख्येने येतात. दरम्यान, रेव्ह पार्टी अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित केली जाते. या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, दारू वा नाचगाण्यांची रेलचेल असते. काही घटनांत सेक्सचे कॉकटेलही असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App