दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केली आहे टीका
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ‘स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणा’वरून नव्या वादात सापडले आहेत. लखनऊ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्वाती मालीवाल यांच्याशी संबंधित पत्रकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगले. त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, मात्र अखिलेश यादव यांनी उडी घेत बेताल उत्तर दिले. अखिलेश म्हणाले, “अरे, यापेक्षा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, भाजपचे लोक कोणाचे नातेवाईक नाहीत, भाजपचे लोक खोटे गुन्हे दाखल करणारी टोळी आहेत.”Akhilesh also on target in Swati Maliwal case, same mistake done as Mulayam Singh
अखिलेश यादव यांचे दिवंगत वडील आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनीही असेच वादग्रस्त विधान केले होते. 2014 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका सभेत मुलायम सिंह यांनी बलात्कारासाठी फाशी देणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. बलात्काऱ्यांचा बचाव करण्यासाठी हेही म्हणाले होते की मुलं चुका करतात.
अशा संवेदनशील प्रकरणात अशी टिप्पणी करून अखिलेश यादव भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, “मुले चुका करतात” अशी विधाने करणाऱ्या दिवंगत मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या मुलाकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते? इंडी आघाडीकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा करणे चुकीचे आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App