ओमानमध्ये भारतीयाच्या मृत्यूमुळे संतप्त कुटुंबीयांनी ‘एआयएसएटीएस’ कार्यालयाबाहेर ठेवला मृतदेह

नुकसान भरपाईची मागणी केली; जाणून घ्या, काय केला आहे आरोप?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ओमानमध्ये एका भारतीय नागरिकाच्या मृत्यूनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी निषेध नोंदवला असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कुटुंबीयांनी मृतदेह एआयएसएटीएस कार्यालयाबाहेर ठेवून निषेध केला. 13 मे रोजी ओमानमधील रूग्णालयाच्या ICU मध्ये दाखल असलेल्या एका भारतीयाचा मृत्यू झाला होता. जर एअर इंडिया एक्स्प्रेसचे फ्लाइट रद्द केले नसते, तर त्याची पत्नी मृत्यूपूर्वी पतीला भेटू शकली असती, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता.After the death of an Indian in Oman the angry family kept the body outside the AISATS office



एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वारंवार उड्डाणे रद्द होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे मृताची पत्नी पतीला भेटायला जाऊ शकली नाही. आपल्या मुलीला ओमानला जाण्याची परवानगी दिली असती तर कदाचित मृत्यू टाळता आला असता, असा दावा मृताच्या सासरच्यांनी केला आहे. मृताचा मृतदेह केरळला आणण्यात आला आणि काही वेळातच कुटुंबातील सदस्य एअर इंडिया सेट्स प्रायव्हेट लिमिटेड (AISATS) च्या कार्यालयाबाहेर मृतदेहासह पोहोचले. कुटुंबीयांनी मृतदेह कार्यालयाबाहेर ठेवून निदर्शने केली.

विमान कंपनीच्या उदासीनतेमुळे आपल्या जावयाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या सासऱ्यांनी केला आहे. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत एअर इंडिया एक्सप्रेसला यावर उत्तर द्यावे लागेल असे सांगितले. मृतकाचे सासरे म्हणाले, ‘माझी मुलगी आणि माझ्या नातवंडांची काळजी घेण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसला आम्हाला भरपाई द्यावी लागेल. जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत मी येथून कुठेही जाणार नाही.’ चर्चेनंतर आंदोलन संपवून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

After the death of an Indian in Oman the angry family kept the body outside the AISATS office

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात