नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे दुबळ्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की; नाशिक मधून मोदींचा हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एवढा दारूण पराभव होणार आहे की मान्यताप्राप्त विरोधी पक्ष असे देखील त्यांचे स्थान राहणार नाही. पण या दुबळ्या काँग्रेसमध्ये नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विलिनीकरण नक्की होणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंडोरी मधल्या जाहीर सभेत काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे वाभाडे काढले.Merger of fake Shiv Sena and fake NCP into weak Congress is certain; Modi’s attack from Nashik!!

नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण हे नक्की आहे. मात्र ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलीनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल, त्या दिवशी मला सर्वांत जास्त बाळासाहेब ठाकरे आठवण येईल. ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करीन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाल्याची आठवण मोदींनी करून दिली. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारणे आणि जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटवून टाकणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्यामुळे सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याचा आरोप नरेंद मोदी यांनी केला.



नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

वीर सावरकरांचा उल्लेख करत ठाकरे गटावर टीका

वीर सावरकरांवंर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना नकली शिवसेना डोक्यावर घेऊन फिरत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हे सर्व पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनामधील संताप प्रचंड उसळतो. मात्र आपल्या अहंकारात चूर झालेल्या नकली शिवसेनेच्या नेत्यांना सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा राग येत नाही. त्यामुळे आता नकली शिवसेनेला शिक्षा करण्याचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसने प्राणप्रतिष्ठाच्या निमंत्रणाला ठोकारले. तर नकली शिवसेनेने देखील तोच मार्ग अवलंबला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राम मंदिराबद्दल उलटसुलट बोलत आहे मात्र, नकली शिवसेना यावर काहीही बोलत नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गेल्या 10 वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तुमची सेवा हेच माझे सर्वात मोठे लक्ष असल्याचेही मोदी यांनी या वेळी म्हटले आहे.

जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काल वाराणसी आणि आज त्र्यंबकेश्वरच्या धरतीमधून मी सर्वांना प्रणाम करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

काठी, घोंडगी आणि गांधी टोपी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गंगापूत्र म्हणून उल्लेख

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गंगापूत्र म्हणून केला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. नाशिक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी घेऊन येणारे म्हणून मोदी गंगापूत्र ठरतील असा विश्वास या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मतांच्या लाचारीसाठी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Merger of fake Shiv Sena and fake NCP into weak Congress is certain; Modi’s attack from Nashik!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात