नाशिक : पैसे वाटपाच्या आरोपांच्या फंड्यातून खरं तर सत्ताधारी समूहच आता बदलल्याचे संकेत मिळत आहेत. Language of money distribution signals shift in power structure in India
म्हणजे हेच बघा ना, पूर्वी म्हणजे अगदी 1960 सत्राच्या दशकापासून ते अगदी 1990 च्या दशकांपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा काँग्रेस मधून फुटून गेलेल्या दुसऱ्या कुठल्या काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या बंडखोर नेत्यांवर पैसे वाटल्याचे आरोप व्हायचे. ते आरोप प्रामुख्याने भाजप किंवा शिवसेनेचे किंवा कम्युनिस्ट पार्टीचे नेते करायचे. ते आरोप कधी सिद्ध झाले नाहीत, कारण तसे आरोप सिद्ध करण्याची यंत्रणाच काँग्रेस सरकारच्या काळात अस्तित्वात नव्हती. किंवा अस्तित्वात असली तरी ती फारच कमकुवत होती.
भाजपसह बाकीच्या विरोधी पक्षांचे सगळे नेते काँग्रेस नेत्यांवर पैसे वाटल्याचे आरोप करायचे. दारू + मीठ वाटल्याचे आरोप करायचे, पण प्रत्यक्षात त्या आरोपांचे पुढे काहीच व्हायचे नाही. पुराव्याअभावी त्या आरोपांची वासलात लागायची आणि काँग्रेसचे कोणतेही नेते सहजपणे निवडून यायचे. मध्ये मध्ये एखाद्या पुंजक्यासारखे विरोधी पक्षांचे आमदार – खासदार निवडून यायचे.
भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत, एकनाथ खडसे निवडणूक रिंगणाच्या बाहेर!!
पण आता विशेषतः 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पक्षांच्या इंडी आघाडीतले नेते भाजप आणि शिवसेनेसारख्या सत्ताधाऱ्यांवर पैसे वाटले, खोकी वाटली, पेट्या वाटल्या असे आरोप करतात. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 तासांच्या दौऱ्यासाठी 12 बॅगा भरून 12 – 13 कोटी रुपये हेलिकॉप्टर मधून आणले आणि एका हॉटेलवर नेऊन ते पैसे कुणाकुणाला वाटले, असा आरोप करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरल्याचे व्हिडिओ शेअर केले. त्याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी अहमदनगर मध्ये भाजपच्या उमेदवाराने पैसे वाटले, असे आरोप केले. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ पण रोहित पवारांनी शेअर केले. पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी तर पैसे वाटपाच्या आरोपावरून काल पोलीस स्टेशनमध्ये राडा केला. पोलिसांनी आमच्याकडे पुरावे नाहीत हे स्पष्ट सांगून धंगेकरांना वाटेला लावले.
पण सत्ताधाऱ्यांवर होणाऱ्या या आरोपांचा पॅटर्न बघितला तर काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांचे नेते आता सत्ताधाऱ्यांवर म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे उमेदवारांवर पैसे वाटल्याचे आरोप करत आहेत. याचा अर्थ सत्ताधारी समूह पूर्णपणे बदलल्याचे हे संकेत आहेत. पूर्वी काँग्रेस सतत सत्तेवर यायची. भाजपा सारख्या बाकीच्या पक्षांना कायम विरोधी बाकांवर बसावे लागायचे. त्यामुळे आपल्या “डीएनए” मध्येच विरोधी पक्ष आहे, असा “जावईशोध” मध्यंतरी भाजपचे राज्यातले मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लावला होता. परंतु तो “जावईशोध” आता खोटा ठरला. उलट भाजपचे नेते आता खऱ्या अर्थाने सत्ताधारी झाले आणि काँग्रेस प्रणित पक्षांचे नेते कायमचे विरोधी बाकावर बसायला तयार झाले, हेच पैसे वाटायच्या आरोपाच्या फंड्याचे खरे राजकीय इंगित आहे.
पूर्वी व्हिडिओ आणि फोटो इतके सहज शेअर करण्यासाठी उपलब्ध व्हायचे नाहीत. आता ते उपलब्ध होऊ शकतात, एवढाच काय तो फरक पडला आहे. पण सत्ताधारी समूह दीर्घकाळासाठी बदलल्याचे एक परिमाण म्हणून पैसे वाटपाच्या फंड्याकडे पाहता येण्यासारखी स्थिती आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App