सॅम पित्रोदा यांनी भारतीयांच्या वर्णाबाबत वादग्रस्त विधान केल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चर्चेत आलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी बुधवारी (8 मे) ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात आला. यावर काँग्रेसचे माजी खासदार आणि नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले संजय निरुपम यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सॅम पित्रोदांना अनेकदा निवडणुकीदरम्यान फटका बसतो.
संजय निरुपम म्हणाले, “सॅम पित्रोदा यांना निवडणुकीच्या वेळी अनेकदा फटका बसतो, कारण त्यावेळी ते मूर्खपणाचे बोलतात. काँग्रेस त्यांना हे सर्व करायला लावते का? हे एक रहस्य आहे. मात्र, भारतीयांची नागरिकाची चिनी आणि आफ्रिशी नागरिकांशी तुलना करून त्यांनी भारतीय वर्णाचा अपमान केला आहे. हे एक प्रकारे राष्ट्रविरोधी कृत्य आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी पित्रोदा यांचा निर्णय मान्य केला आहे. रमेश म्हणाले, “ सॅम पित्रोदा यांनी ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा निर्णय मान्य केला आहे.”
पित्रोदा एका पॉडकास्टमध्ये म्हणाले, “आम्ही भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एकसंध ठेवू शकतो. पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे, उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App