विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नुकतेच भारतीयांच्या वर्णाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादात आलेले सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अन् काँग्रेसनेही तत्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी X वर पोस्ट करताना याबाबत माहिती दिली आहे.Sam Pitroda resigned after being surrounded by controversy
एक्स वर पोस्ट करताना जयराम रमेश यांनी माहिती दिली की सॅम पित्रोदा यांनी स्वतःच्या इच्छेने या पदाचा राजीनामा दिला आहे. पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, ‘सॅम पित्रोदा यांनी स्वत:च्या इच्छेने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
जयराम रमेश यांनी सॅम पित्रोदा यांच्या माजी पदाच्या राजीनाम्याचे कारण दिलेले नाही. मात्र, त्यांनी नुकत्याच केलेल्या वर्णाबाबतच्या वक्तव्यानंतर राजीनामा दिल्याचे मानले जात आहे. बुधवारी पित्रोदा यांचे एक विधान समोर आले होते ज्यात त्यांनी म्हटले होते की, पूर्व भारतीय हे चिनी लोकांसारखे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. ज्यावरून भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App