विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप विरुद्ध काँग्रेसच्या लढाईत आरक्षणाचा मुद्दा तापला असताना लालूप्रसाद यादव मुस्लिम यांना आरक्षण द्यायला पुढे सरसावले, पण धर्माच्या आधारावर लालू आरक्षण देत आहेत, हे पाहून काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीचे नेतेही धास्तावले. त्यामुळे लालूप्रसाद यादव सगळीकडून ट्रोल झाले. Lalu Prasad rushed to give reservation to Muslims
लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर भाजप आणि मित्र पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना ट्रोल केले. यात काही विशेष नाही घडले, पण काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीतले नेतेही घाबरून लालूप्रसादांचे समर्थन करायला पुढे आले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीवर ओबीसींचे आरक्षण काढून ते मुसलमानांना देण्याचा घाट घातल्याचा आरोप केल्या पाठोपाठ विरोधक अडचणीत आले. त्यांना खुलासे द्यायला लागले, पण भाजपने सोशल मीडियावर ओबीसी आरक्षणात मुसलमान घुसल्याचे वेगवेगळे मीम्स आणि व्हिडिओ चालवले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी भडकून निवडणूक आयोगात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याविरुद्ध तक्रार केली. पण त्यामुळे भाजप नेते काही बधले नाहीत.
दरम्यानच्या काळात आज लोकसभेचे तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केले. मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे लालूप्रसाद यादव म्हणाले. धर्माच्या आधारावर कोणतेही आरक्षण देता येणार नाही, अशी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद असताना लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केल्याने काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीचे नेते अडचणीत आले. त्यांना उघडपणे लालूप्रसादांचे समर्थन करणे अवघड झाले. कर्नाटकात ज्याप्रमाणे एक फतवा काढून ओबीसी आरक्षणातला टक्का मुसलमानांना परस्पर दिला, तशाप्रकारे इतरत्र आरक्षण मोहीम राबवायचा काँग्रेसचा इरादा होता. लालूप्रसादांच्या मुस्लिम आरक्षणाच्या जाहीर वक्तव्याने त्याला खोडा बसला. त्यामुळे लालूप्रसाद यादव सगळीकडून ट्रोल झाले.
“मुसलमानांनादेखील संपूर्ण आरक्षण मिळायला हवं. या निवडणुकीत लोकांची मतं आमच्या बाजूने वळत आहेत. त्यामुळे भाजपावाले घाबरले आहेत. त्यांना संविधान नष्ट करायचं आहे. परंतु, जनतेने त्यांचा डाव ओळखला आहे.” : लालूप्रसाद यादव
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App