हैदराबादेतून 6 लाख मतदारांची नावे हटवली; मोठ्या उलथापालथीची शक्यता, बोगस मतांचा सफाया

वृत्तसंस्था

हैदराबाद : निवडणूक आयोगाने ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील सुमारे ६ लाख मतदारांची नावे वगळली आहेत. हटवलेली नावे मरण पावल्या व्यक्ती, इतरत्र स्थायिक झालेले किंवा बनावट होती.Names of 6 lakh voters deleted from Hyderabad; Chances of major upheaval, purge of bogus votes



एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादच्या निकालावर याचा परिणाम होणार, हे निश्चत. असदुद्दीन ओवेसी २००२ पासून या जागेवर विजयी होत आहेत. काही वर्षांपासून फिरोज खानसारखे भाजप व काँग्रेसचे नेते दुबार किंवा खोट्या मतदारांचा मुद्दा उपस्थित करत होते.

हैदराबादमध्ये विधानसभेच्या सात जागा जिंकणारे एमआयएम याच मतांच्या फेरफारातून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप आहे.

एकट्या ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात तब्बल 60,953 डुप्लिकेट मते आढळून आले. त्यापैकी 3,101 नावे मृत, 53,012 मते इतरत्र स्थायिक झालेल्यांची आहेत. चंद्रयांगुट्टा व याकूतपुरा विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे 59,289 व 48,296 मते हटवण्यात आली. 2019 मध्ये हैदराबाद लोकसभेत 20 लाख मतदार होते. त्यापैकी 12% मते कमी झालीत. मात्र, वर्षभरात जिल्ह्यात 5 लाख नवी नावे समाविष्ट झाली.

Names of 6 lakh voters deleted from Hyderabad; Chances of major upheaval, purge of bogus votes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात