ठाकरे शिवसेना 21; काँग्रेस 17; पवार राष्ट्रवादी 10; महाविकास आघाडीत काँग्रेस तोट्यात; सांगली, भिवंडीच्या जागा गमावल्या!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वाचवण्याच्या नादात काँग्रेसला आज भरपूर त्याग करावा लागला. महाविकास आघाडी टिकवून ठेवताना काँग्रेसला सांगली आणि भिवंडी या दोन लोकसभांच्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. मात्र, त्याऐवजी दक्षिण मध्य मुंबई आणि कोल्हापूर या जागा काँग्रेसने पदरात पाडून घेतल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेना 21 काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 असा फॉर्म्युला निश्चित झाला. NCP SCP will contest elections on 10 seats and Congress on 17 seats

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीतल्या सर्व बड्या नेत्यांचे एकत्रित पत्रकार परिषद झाली त्यामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला वाचून दाखविला. काँग्रेसला दोन जागांचा त्याग करावा लागला. तुमचे काँग्रेसचा अपमान झाला असे नव्हे, कारण देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची होमशाही घालवायची असेल तर मोदीविरोधी ताकदींनी एकत्र येण्यासाठी सर्वांना थोडाफार त्याग करावाच लागेल अशी मखलाशी नाना पटोली यांनी या पत्रकार परिषदेत केली.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे 21 उमेदवार आधीच जाहीर केले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन जागांचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा सातारा आणि रावेर यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार याच्या दोन-तीन दिवसात जाहीर करू असे शरद पवारांनी सांगितले, तर काँग्रेसचे धुळे, नंदुरबारचे उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करू असे नाना पाटोले म्हणाले. सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांची समजूत काढू तसेच दक्षिण मध्य मुंबईत विनोद घोसाळकर यांची समजूत काढू, असे नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी पण केली काल एक विचित्र योगायोग होता. सूर्यग्रहण, अमावस्या आणि नरेंद्र मोदींचे भाषण असा त्रिग्रही योग काल होता, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणाल्याचा राग उद्धव ठाकरेंनी मोदींच्या भाषणाला सूर्यग्रहण आणि अमावस्येशी जोडून काढला.

NCP SCP will contest elections on 10 seats and Congress on 17 seats

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात