फडणवीसांची मात्रा पडली लागू; कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक नरमले; श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा!!

In Kalyan, BJP MLA Ganpat Gaikwad's supporters softened

विशेष प्रतिनिधी

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना आणि भाजप यांच्या बरीच भवती न भवती होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली, ती मात्र आता ठाणे जिल्ह्यात लागू पडली असून फडणवीसांच्या आजच्या केरळ दौऱ्यादरम्यानच ठाणे जिल्ह्यातल्या भाजप समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून टाकला. आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थ सुरुवातीला नाराज होते पण त्यांच्या नाराजीवर फडणवीस मात्रा चालली. भाजपच्या नेतृत्वापुढे मान तुकवत गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांचे समर्थन केले. In Kalyan, BJP MLA Ganpat Gaikwad’s supporters softened

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असेल तर सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण या वादात स्वतः फडणवीस यांनी लक्ष घातल्यानंतर
अखेर या वादावर पडदा पडला असून भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात भाजप मधील वरिष्ठांना यश आले आहे. यामुळे खासदार शिंदे यांच्यापुढील अडचण कमी झाली.

दोन दिवसांपूर्वीच गायकवाड यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत याची चर्चा झाली होती. भाजप कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली तरी कार्यकर्त्यांना समज देण्याची मागणी शिवसेना गोटातून होत होती.

आज सकाळीच मंत्री चव्हाण यांच्या बंगल्यावर कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. यानंतर कल्याण मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी घेतली पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले.

कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती ती गैर नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली त्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. गणपत गायकवाड यांनी देखील पक्षाची भूमिका मान्य केली. त्यांनी कार्यकर्त्याना हेच सांगितले आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे, राज्यात 45 पार करायचे आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे.

गणपत गायकवाड यांच्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी समर्थन केलं असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी बैठक घेतली आणि घोषणा केल्या. त्याअर्थी ते गुंड होत नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणे गैर नाही. भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

In Kalyan, BJP MLA Ganpat Gaikwad’s supporters softened

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात