प्राथमिक तपासात हे प्रकरण नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित असल्याचे समजते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुलांची तस्करी प्रकरणी सीबीआयने दिल्लीतील अनेक भागात छापे टाकले आहेत. छाप्यादरम्यान सीबीआयच्या पथकाने केशवपुरम येथील घरातून दोन नवजात बालकांची सुटका केली. प्राथमिक तपासात हे प्रकरण नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित असल्याचे समजते. सध्या सीबीआयचे पथक मुले विकणाऱ्या महिलेची आणि त्यांना खरेदी करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहे.Gang of child abductors busted in Delhi CBI frees many children, arrests women
याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने एका महिलेसह काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. एनसीआर आणि दिल्लीमध्ये बाल तस्करीच्या प्रकरणात सीबीआयने 7-8 मुलांची सुटका केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि काही महिलांचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयचे सहाय्यक कामगार आयुक्तही बाल तस्करी प्रकरणात सहभागी असून ते या सिंडिकेटचा एक भाग आहेत.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात सुमारे 10 मुलांची विक्री करण्यात आली आहे. या तस्करीचे तार अनेक राज्यांत पसरलेले आहेत. अनेक मोठी रुग्णालये सीबीआयच्या रडारवर आहेत. या मुलांना चार ते पाच लाख रुपयांना विकले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App