पवारांना बारामतीत मोठा धक्का; सुप्रिया सुळे यांचा प्रचारप्रमुखच इंदापुरात फडणवीसांच्या गळाला!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : आपण टाकलेल्या डावामुळे देवेंद्र फडणवीस परत आले नाही आणि ज्यावेळी ते परत आले, त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून यावे लागले. ते मुख्यमंत्री राहिले नाहीत, असा दावा शरद पवारांनी केला, पण आता त्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या बारामतीत घुसून इंदापूरातला त्यांचा प्रचारप्रमुखच आपल्या गळाला लावला. A big blow to sharad Pawar in Baramati

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांची भेट घेतली आहे. प्रवीण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत. त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. देवेंद्र फडणवीसांनी आज इंदापुरात आज भाजप कार्यकर्ता मेळावा घेतला. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण यामुळे इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या सर्व कार्यकर्त्यांची आज कार्यकर्ता मेळाव्यातून नाराजी दूर केली. हर्षवर्धन पाटलांच्या विनंतीनुसार त्यांनी हर्षवर्धन पाटलांसकट संपूर्ण इंदापूरचे पालकत्व स्वीकारले.

भाजपच्या मेळाव्यासाठी इंदापुरात दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रवीण माने यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चहापान केले. फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीमुळे प्रवीण माने अजित पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे ते गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते.

प्रवीण मानेंशी जुने संबंध

देवेंद्र फडणवीस यांची प्रविण माने यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. प्रवीण मानेंशी माझे खूप जुने वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, इंदापुरात तुम्ही येता पण माझ्याकडे येत नाहीत. त्यामुळे मी कबूल केलं होती की, मी तुमच्याकडे चहा प्यायला येईन. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो. ते आमच्यासोबतच आहेत. आमचे जुने सहकारी आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

A big blow to sharad Pawar in Baramati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात