लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलेल्या वरूण गांधींना काँग्रेसचे निमंत्रण!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपने उत्तर प्रदेशातील पिलीभीत लोकसभा मतदारसंघातेन तिकीट नाकारलेल्या वरूण गांधींना काँग्रेसने निमंत्रण दिले आहे. मावळत्या लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी वरूण गांधी काँग्रेसमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच होईल असे वक्तव्य केले आहे. BJP denied him a ticket because varun gandhi is related to the Gandhi family. I think he should come

वरूण गांधी भाजपचे पिलीभीत मधून खासदार होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत केंद्रातल्या मोदी सरकारच्या धोरणाविरुद्ध कायम शरसंधान साधले होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा बाकी कुठल्या नेत्याविरुद्ध वैयक्तिक टीका टिप्पणी करत नव्हते. परंतु मोदी सरकार अडचणीत येईल, अशी त्यांची वक्तव्य होती.

वरूण गांधी आणि त्यांची आई मने का गांधी यांच्या देखील राजकीय मतभेद झाल्याची बातमी समोर आली. भाजपने वरूण गांधींना पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले, पण मनेका गांधी यांना सुलतानपूर मधून तिकीट दिले. हे मतभेदांचे निदर्शक होते.

वरूण गांधी अजूनही अधिकृतरित्या भाजपचेच नेते आहेत. त्यांनी स्वतःहून पक्ष सोडलेला नाही, पण पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसने त्यांना आपल्याकडे येण्याची लालूच दाखविली आहे. वरूण गांधी हे सुशिक्षित नेते आहेत. गांधी परिवाराशी त्यांचा संबंध आहे. त्यामुळे ते इकडे आले, तर स्वागतच होईल, अशा शब्दांमध्ये अधीर रंजन चौधरी यांनी वरूण गांधींना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. पण वरूण गांधी भाजपा कायमचा सोडून खरंच काँग्रेसमध्ये आले, तर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळेलच, याची मात्र गॅरंटी अधीर रंजन चौधरी यांनी दिलेली नाही.

BJP denied him a ticket because varun gandhi is related to the Gandhi family. I think he should come

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात