ईडीच्या कोठडीतून कायद्याच्या अडून केजरीवाल बसणार खुर्चीला चिकटून!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीने अटक करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपल्या कोठडीत ठेवले आहे. तेथूनच ते दिल्लीचा कारभार हाकत आहेत. त्यांचा राजीनामा देण्याचा बिलकुल इरादा नाही. याचा अर्थ किडीच्या कोठडीतून कायद्याचा आडून केजरीवाल बसणार खुर्चीला चिकटून असा काढला जात आहे.Arvind Kejriwal was, is and will continue to be the chief minister of Delhi.”



अरविंद केजरीवालांनी ईडीच्या कोठडीतूनच सरकार चालवण्याचा आटापिटा चालवला आहे. ते दररोज दिल्लीच्या मंत्री अतिशी मार्लेना यांना कोठडीतून काही आदेश देतात आणि आतिशी ते आदेश बाहेर वाचून दाखवून अधिकाऱ्यांना निर्देश देतात. सर्व सरकारी बैठकांमध्ये सामील होतात. अरविंद केजरीवाल ईडीच्या कोठडीत असले, तरी सरकारला काही फरक पडलेला नाही असेच दाखवण्याचा यातून त्यांचा प्रयत्न आहे.

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का??, असे विचारल्यावर आज अतिशय म्हणाले अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि भविष्य काळातही राहतील. याबाबतचा कायदा स्पष्ट आहे. कोणत्याही व्यक्तीला दोन वर्षांची किंवा त्याच्या पेक्षा जास्त शिक्षा झाली तर आणि तरच राजीनामा द्यावा लागतो. अन्यथा ती व्यक्ती पदावर राहू शकते. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे कालही दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आजही ते मुख्यमंत्रीच आहेत आणि उद्याही ते मुख्यमंत्रीच राहतील.

अतिशी यांच्या वक्तव्यामुळेच ईडीच्या कोठडीतून कायद्याच्या आडून केजरीवाल बसणार खुर्चीला चिकटून ही बाब स्पष्ट होत आहे.

Arvind Kejriwal was, is and will continue to be the chief minister of Delhi.”

महत्वाच्या बातम्या
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात