सोलापुरात प्रणिती शिंदे – राम सातपुते यांच्यात स्वागताची रंगली पत्ररुपी जुगलबंदी!!

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : भाजपाने पाचव्या यादीत सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी दिल्यावर काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात “स्वागता”ची जुगलबंदी रंगली. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना एक खोचक पत्र लिहून त्यांचे सोलापुरात स्वागत केले. लोकशाही, जनहिताचे मुद्दे वगैरे शब्दांची पखरण करत प्रणिती शिंदेंनी भाजपला टोले हाणले, पण राम सातपुतेही प्रत्युत्तर देण्यात काही कमी पडले नाहीत. त्यांनी देखील प्रणिती शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्या “स्वागता”चे “स्वागत” केले आणि काँग्रेसला टोले हाणून घेतले. Praniti shinde – ram satpute political jugalbandi in solapur

या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांची पत्रे अशी :

– प्रणिती शिंदेंचे पत्र

मा. राम सातपुते जी,

‘आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते.’

‘लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.’

‘सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते.’

– प्रणिती सुशीलकुमार शिंदे

राम सातपुतेंचे पत्र

आ. प्रणिती शिंदेजी,
जय श्रीराम

मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतो आहे. मी आमदार झाल्यापासून आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परिने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय.

मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढी वर्षे राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता चांगलंच ओळखलं आहे.

@ShindePraniti ताई, जय श्रीराम! आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!

गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन!

माझ्याही आपणांस खूप खूप शुभेच्छा!

— Ram Satpute (Modi Ka Parivar) (@RamVSatpute) March 25, 2024

राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामागराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपाने जो विश्वास दाखवला आहे, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करुन सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. वंदे मातरम

आपला विनीत,
राम सातपुते

त्यामुळे प्रणिती शिंदेंनी लिहिलेले पत्र आणि त्याला राम सातपुते यांनी दिलेले प्रत्युत्तर याची चर्चा सोलापूर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.

Praniti shinde – ram satpute political jugalbandi in solapur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात