जावेद मियांदादने केलं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं कौतुक!

मियांदादचा मुलगा जुनैदचा विवाह दाऊद इब्राहिमची मुलगी माहरुखसोबत झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कौतुक केले आहे. दाऊद इब्राहिमसोबत कौटुंबिक संबंध असणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी अंडरवर्ल्ड डॉनला दाऊला असा व्यक्ती संबोधलं, ज्याने मुस्लिमांच्या हितासाठी खूप काही केलं आहे.Javed Miandad praised underworld don Dawood Ibrahim!



एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान जावेद मियांदाद म्हणाले, “मी त्यांना दुबईतून खूप दिवसांपासून ओळखतो. त्यांच्या मुलीने माझ्या मुलाशी लग्न केले ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. माझी सून खूप शिकलेली आहे. तिने अभ्यास केला आहे. कॉन्व्हेंट शाळेत आणि पुढील अभ्यासासाठी एका प्रसिद्ध विद्यापीठात गेली आहे.” मियांदादचा मुलगा जुनैदचा विवाह दाऊद इब्राहिमची मुलगी माहरुखसोबत झाला आहे. 2005 मध्ये दोघांनी दुबईत लग्न केले आहे.

मियांदाद पुढे म्हणाले, “दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. खरा दाऊद इब्राहिम समजून घेणे सोपे नाही. लोक त्यांच्या कुटुंबाबद्दल जो विचार करतात, तसे अजिबात नाही.”

दाऊद इब्राहिम हा भारतात वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचे षडयंत्र रचले होते, ज्यात सुमारे 250 लोक मरण पावले होते. त्याच्याकडे डी-कंपनी देखील आहे, जी त्यांनी 1970 मध्ये मुंबईत सुरू केली होती. पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर कराचीच्या पॉश क्लिफ्टन भागात दाऊद राहत असल्याचे मानले जाते. मात्र, पाकिस्तानने हे मान्य करण्यास वारंवार नकार दिला आहे.

Javed Miandad praised underworld don Dawood Ibrahim!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात