विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर करतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका पाठोपाठ एक ट्विटचा धडाका लावला. 140 कोटी भारतीय जनतेला लोकशाहीच्या महोत्सवात आनंदाने सहभागी होण्याच्या आवाहनाबरोबरच त्यांनी विरोधकांना जोरदार तडाखाही लावला. Modi welcomes elections schedule, targets opposition bluntly
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे सगळे शेड्युल जाहीर केल्याबरोबर संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या महोत्सवाचे स्वागत करताना देशातल्या 140 कोटी भारतीय जनतेला या महोत्सवात उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होण्याचे आवाहन केले. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवर्जून पुढे आले पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले.
Prime Minister Narendra Modi tweets "The biggest festival of democracy is here. EC has announced the 2024 Lok Sabha election dates. We, the BJP-NDA, are fully prepared for elections. We are going to the people on the basis of our track record of good governance and service… pic.twitter.com/Ah2Kw6RHKX — ANI (@ANI) March 16, 2024
Prime Minister Narendra Modi tweets "The biggest festival of democracy is here. EC has announced the 2024 Lok Sabha election dates. We, the BJP-NDA, are fully prepared for elections. We are going to the people on the basis of our track record of good governance and service… pic.twitter.com/Ah2Kw6RHKX
— ANI (@ANI) March 16, 2024
मोदींच्या ट्विट्सचा आशय असा :
सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणुकीची तयारी आधीपासूनच केली आहे. केंद्र सरकार त्याच्या परफॉर्मन्सच्या आधारावर आपले रिपोर्ट कार्ड घेऊनच जनतेसमोर जात आहे. त्यामुळे जनतेचा पुन्हा एकदा आम्हालाच पाठिंबा मिळेल असा विश्वास मोदींनी या ट्विट मधून व्यक्त केला आहे.
गेल्या 10 वर्षांत आपल्या सरकारने किती कशी आणि किती उज्वल कामगिरी केली याचा आढावा देखील मोदींनी आपल्या वेगवेगळ्या ट्विट म्हणून घेतला आहे. 10 वर्षांपूर्वी आमचे सरकार अस्तित्वात आले असताना देशात अतिशय निराशाजनक वातावरण होते. आधीच्या सरकारचा परफॉर्मन्स एवढा खराब होता की, देशाला कोणती आशा आणि अपेक्षाच उरलेली नव्हती. संपूर्ण जगानेही भारताकडून काही घडण्याची अपेक्षा सोडून दिली होती, पण गेल्या 10 वर्षांमध्ये देशाच्या 140 कोटी जनतेने आपला निर्धार दाखविला आणि देशात किती सकारात्मक परिवर्तन घडू शकते याची चुणूकही दाखवली. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणून ठेवली.
देशात चांगल्या नियतीचे सरकार असेल तर परफॉर्मन्स ही उत्तम होतो हे देशातल्या जनतेने गेल्या दहा वर्षात अनुभवले कोट्यावधी लोक आपल्या मेहनतीच्या आधारे दारिद्र्य रेषेच्या वर आले सरकारच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात घुसल्या कोट्यावधी जनतेने त्याचा लाभ घेतला आणि त्यातून त्यांच्या जीवनात परिवर्तन आले 140 कोटी जनतेच्या विश्वासाने आणि निर्धाराने संपूर्ण देश पुढे गेला. या निर्धारमुळेच आमच्या सरकारला अबकी बार 400 पार ही आत्मविश्वास पूर्ण घोषणा देत आली.
देश प्रगतीपथावर अत्यंत वेगाने वाटचाल करत असताना सरकारचे विरोधक मात्र आजही सरकारला शिव्या देण्यातच मग्न आहेत. विरोधक आजही घराणेशाहीच्या शापानेच ग्रस्त आहेत. आपल्या घराण्यापलीकडे कोणी चांगले काम करू शकते, देश प्रगत होऊ शकतो, याची जाणीवच त्यांना नाही. कुटुंबासाठी सत्ता आणि सत्तेसाठी कुटुंब हीच त्यांची धारणा असल्यामुळे ते भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत. आज भारताला त्यांच्या नेतृत्वाची गरज नाही. कारण भारतातल्या युवाशक्तीने, महिला शक्तीने शेतकऱ्यांनी विकासाचा निर्धार केला आहे. तो पूर्ण करण्याचा आमचा सरकारचा संकल्प आहे, अशा प्रकर शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांनाही या ट्विटमधून फटकारले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App