महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत गडकरी, पंकजा मुंडे, पियुष गोयल; खासदारांची तिकिटे कापण्याच्या माध्यमांच्या बातम्या ठरल्या खोट्या!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीचे अधिकृत जागावाटप होण्यापूर्वीच भाजपने महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक जाहीर केल्याप्रमाणे नितीन गडकरींचे नाव समोर आले आहे. त्यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांचीही नावे यादीत आली आहेत. त्याचबरोबर डॉ. सुभाष भामरे, रक्षा खडसे आदी खासदारांची तिकिटे कापली जाण्याचा बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या, पण त्या खोट्या ठरल्या.Maharashtra’s first list includes Gadkari, Pankaja Munde, Piyush Goyal; The media reports of cutting the tickets of MPs are false!!

डॉ. सुभाष भामरे यांना धुळ्यातून आणि रक्षा खडसे यांना रावेर मधून भाजपने पुन्हा संधी दिली आहे, त्याचबरोबर पुण्यातून अपेक्षेप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांचेही नाव पहिल्या यादीत आले आहे. जालन्यातून रावसाहेब पाटील दानवे यांनाच पक्षाने संधी दिली आहे.



2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे पडल्यानंतर त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मराठी प्रसारमाध्यमे त्यांना तिकीट मिळण्याच्या बातम्या द्यायची आणि त्यानंतर त्यांच्यावर अन्याय केल्याच्या बातम्याही द्यायची, पण त्या बातम्यांमध्ये त्या बातम्यांकडे लक्ष न देता भाजपने आपल्या स्कीमनुसार पंकजा मुंडेंना सुरुवातीला मध्य प्रदेशचे सहभागी नेमले. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून मैदानात उतरवले आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भाजपने गोपाळ शेट्टी यांच्या जागी मुंबईतून तिकीट दिले आहे. नंदुरबार मधून डॉ. हिना गावित, दिंडोरीतून भारती पवार यांची नावे पक्षाने पहिल्या यादीतच जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या स्मिता वाघ यांना जळगाव मधून तिकीट दिले आहे.

2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ खडसे भाजप वर चिडून राष्ट्रवादीत गेले. त्यावेळी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या देखील राष्ट्रवादी जाण्याच्या अटकळी बांधल्या गेल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी तसे प्रयत्न देखील केले होते, पण रक्षा खडसे भाजपमधून फुटून राष्ट्रवादी येण्याऐवजी अखेर राष्ट्रवादीच फुटली आणि अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचळणीला निघून गेले.

दरम्यानच्या काळात रक्षा खडसे भाजपचेच काम करत राहिल्या. भाजपच्या व्यासपीठावरून त्या दूर गेल्या नाहीत किंवा पक्षाचा कुठलाही कार्यक्रम त्यांनी टाळला नाही. त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना रावेरमधून तिकीट दिले आहे.

धुळ्यामधून डॉ. सुभाष भामरे यांचे तिकीट बदलले जाणार आणि त्यांच्या ऐवजी कुणाल पाटलांना तिकीट देणार अशा बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या, पण त्या देखील खोट्या ठरल्या. माध्यमांची सूत्रे ढिल्ली पडली आणि सुभाष भामरे यांना पुन्हा धुळ्यातून तिकीट मिळाले.

पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेऊन भाजपने ब्राह्मण समाजाला सकारात्मक संदेश दिला. त्यामुळे पुण्याची “रेस” भाजपसाठी सोपी झाली. तिथून पक्षाचे संघटक सुनील देवधर यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. माजी खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट या देखील रेसमध्ये असल्याचे माध्यमांनी बातम्यांमध्ये म्हटले होते, पण भाजप श्रेष्ठींनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास टाकत त्यांना पुण्यातून लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे.

Maharashtra’s first list includes Gadkari, Pankaja Munde, Piyush Goyal; The media reports of cutting the tickets of MPs are false!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात