अमली पदार्थांच्या तस्करांवर मोठी कारवाई, अरबी समुद्रात 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

हे ड्रग्ज एका बोटीतून आणले जात होते, ज्यामध्ये 6 लोक होते. Big crackdown on drug smugglers drugs worth Rs 480 crore seized in Arabian sea

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमली पदार्थ तस्करांविरोधात गुजरात पोलिसांची मोठी कारवाई यशस्वी झाली आहे. अरबी समुद्रातील पोरबंदर येथे संयुक्त कारवाई दरम्यान, एटीएस, गुजरात पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि तटरक्षक दलाने एक मोठी कारवाई करत सुमारे 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

हे ड्रग्ज एका बोटीतून आणले जात होते, ज्यामध्ये 6 लोक होते. ही बोट पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 मार्चच्या रात्री एका गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या संयुक्त कारवाईत एक पाकिस्तानी बोट समुद्रात पकडण्यात आली होती, ज्यामध्ये सुमारे 480 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

ऑपरेशनमध्ये आयसीजी जहाज आणि डॉर्नियरची मदत घेण्यात आली. डॉर्नियर विमानाला संभाव्य भागात स्कॅनिंग आणि बोट शोधण्याचे काम देण्यात आले होते. परिसराचा कसून शोध घेतल्यानंतर, NCB आणि ATS गुजरातच्या पथकांसह ICG जहाज घटनास्थळी पोहोचले आणि अंधारात संशयास्पदरीत्या फिरत असलेली बोट ओळखली. पोरबंदरपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात ही बोट पकडली.

Big crackdown on drug smugglers drugs worth Rs 480 crore seized in Arabian sea

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात