राहुल गांधी महाराष्ट्रात, नंदुरबार मधून मोदी + अदानींवर नेहमीच्याच फैरी; पण त्याच गावातून लागली काँग्रेसला गळती!!

विशेष प्रतिनिधी

नंदुरबार : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले नंदुरबार मध्ये त्यांनी मोठा रोड शो केला आणि त्यानंतर आदिवासी संवाद सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर त्यांच्या आरोपांच्या नेहमीच्याच फैरी झाडल्या. पण त्याच वेळी काँग्रेसमध्ये नंदुरबार मधूनच पक्षाला गळती लागली. Rahul Gandhi in nandurbar Maharashtra

ज्यावेळी राहुल गांधी नंदुरबार मध्ये रोड शो करत होते आणि जाहीर सभेला संबोधित करत होते, त्याचवेळी नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पद्माकर वळवी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पद्माकर वळवी उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राहुल गांधींनी आजच्या नंदुरबारच्या सभेमध्ये त्यांचे नेहमीचेच आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर फैरी झाडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्ज माफ केल्याचा आरोप त्यांनी केला. त्या उलट आदिवासी तरुणांचा तरुणांचे एक रुपयाचेही कर्ज त्यांनी माफ केले नसल्याचा उल्लेख राहुल गांधींनी केला. “आदिवासी” हे भारताचे मूळ नागरिक आहेत, पण भाजप त्यांना “वनवासी” असे संबोधते. आदिवासींच्या जंगल आणि जमिनीवर उद्योगपतींचा कब्जा करण्यासाठी भाजपचे सरकार काम करते, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

पण ज्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी संपूर्ण देशाला जोडू पाहत आहेत, त्याच न्याय यात्रेतून ते पक्षाची एकजूटही राखू शकत नाहीत हेच दिसून आले कारण भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान त्यांच्याच पक्षातले जुने जाणते नेते पक्षातल्या गटबाजीला कंटाळून पक्ष बाहेरचा रस्ता धरत आहेत, याची राहुल गांधींना साधी भनकही लागली नाही. जे पद्माकर वळवी काँग्रेस मधून बाहेर पडून उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्या पद्माकर वळवींना काँग्रेसने चार वेळा वेळा आमदार केले. दोन वेळा मंत्री केले. परंतु, काँग्रेस मधली गटबाजी पक्षश्रेष्ठी थांबवू शकले नाहीत. त्यामुळे वळवींना काँग्रेस बाहेरचा रस्ता धरावा लागून भाजपच्या वळचणीला जावे लागले, पण राहुल गांधींना या गळती विषयी काही वाटले नाही. त्यांनी त्यावर काही भाष्य देखील केले नाही.

Rahul Gandhi in nandurbar Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात